लय भारी नंतर माऊली मध्ये रितेश-जेनेलिया एकत्र

dhuvun taak song poster
रितेश देशमुखचा आगामी "माऊली" सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. अलीकडेच सिनेमाचा ट्रेलर आणि  "माझी पंढरीची माय" या गाण्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यातच भर म्हणून "माऊली" सिनेमातील नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचा USP म्हणजे रितेश आणि जेनेलिया यांची जोडी ४ वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र आली आहे.


 
"लय भारी" सिनेमातील 'आला होळीचा सण लय भारी' या गाण्यामध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. आता ४ वर्षानंतर हे दोघे पुन्हा एकदा होळीच्याच गाण्यासाठी एकत्र आले आहेत. पण यावेळेस "माऊली" सिनेमातील गाण्यासाठी, या नवीन गाण्याचे नाव आहे "धुवून टाक". या गाण्यात रितेश आणि जेनेलिया दोघांची केमिस्ट्री चांगलीच रंगली आहे आणि प्रेक्षकांना भावत आहे. 


 
"लय भारी" प्रमाणेच "माऊली" सिनेमातील "धुवून टाक" हे गाणे सुद्धा अजय-अतुल या संगीतकार जोडीनेच संगीतबद्ध केले आहे. तर अजय गोगावले याने स्वत: ह्या गाण्याला आवाज दिला आहे. तसेच प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक बोस्को-सीजर यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित "माऊली" हा सिनेमा १४ डिसेंबरला आपल्या भेटीला येत आहे.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar