फर्जंदच्या यशानंतर गनिमीकाव्याची आणखीन एक शूरगाथा फत्तेशिकस्त...

FARZAND POSTER

 ऐतिहासिक सिनेमे बनण्याचे प्रमाण नजीकच्या काळात काहीसे वाढले आहे. बॉलीवूड तसेच मराठी सिनेमातही याची काही उदाहरणे नजीकच्या काळात आपण पाहिली आहेत. गेल्याच वर्षी शिवाजी महाराजांचे शूर मावळे 'कोंडाजी फर्जंद' यांची शौर्यगाथा "फर्जंद" या सिनेमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. एक देखणीय शूरगाथा बनवण्यामध्ये दिग्दर्शक 'दिग्पाल लांजेकर' यांनी कोणतीही कसर सोडली नव्हती. "फर्जंद" सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक 'दिग्पाल लांजेकर' घेऊन येत आहेत भारतातील पहिली सर्जिकल स्ट्राइक "फत्तेशिकस्त".
 या सिनेमातून जवळपास फर्जंद सिनेमातील अनेक कलाकार पुन्हा पाहायला मिळणार आहेत. अभिनेते 'चिन्मय मांडलेकर' पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना पाहायला मिळतील. तर 'कोंडाजी फर्जंद' साकारल्यानंतर 'अंकित मोहन' या सिनेमात 'येसाजी कंक' यांच्या भूमिकेत दिसतील. यांच्या सोबतीला या सिनेमात 'मृणाल कुलकर्णी', 'मृण्मयी देशपांडे', 'तृप्ती तोरडमल', 'हरीश दुधाडे', 'निखिल राऊत', 'समीर धर्माधिकारी', 'अनुप सोनी' आणि आणखीन बरेचसे कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारताना पाहायला मिळतील.
 'छत्रपती शिवाजी महाराज' आणि त्यांच्या मावळ्यांनी केलेल्या एका गनिमीकाव्याची कथा या सिनेमात मांडण्यात आली आहे. या सिनेमाचा मुहूर्त महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे ला पन्हाळा गडावर पार पडला. या सिनेमाचे चित्रीकरण सध्या पन्हाळा येथे सुरू आहे. लवकरच या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात येईल. "फर्जंद" सारखा भव्यदिव्य सिनेमा दिल्यानंतर 'दिग्पाल लांजेकर' पुन्हा एका "फत्तेशिकस्त" या सिनेमात देखील आपल्या दर्शनाची कमाल दाखवतील आणि प्रेक्षकही त्यांना भरभरून प्रतिसाद देतील अशी आशा आहे.

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar