रितेश देशमुख साकारणार खलनायकाची भूमिका... वाचा संपूर्ण बातमी...

RITEISH DESHMUKH

महाराष्ट्रात जन्मलेल्या आणि वाढलेल्या सुपरस्टार अभिनेता रितेश देशमुख याने गेल्या पंधरा वर्षात बॉलीवूडमध्ये खूप नाव कमावले आहे. बॉलीवूड मधील अनेक सुपर हिट चित्रपटांमध्ये त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तरीही मराठी मातीची ओढ त्याला मराठी चित्रपटाकडे घेऊन आली आणि त्याने लय भारी आणि माऊली सारखे ॲक्शन पॅक्ड् मोठे चित्रपट मराठी सिनेमासृष्टीला दिले. लवकरच रितेश देशमुख आणखीन एका मराठी चित्रपटात झळकणार आहे. पण तत्पूर्वी त्याला बॉलीवूड मधील आणखीन एका बड्या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका मिळाली आहे. 

 
 टायगर श्रॉफच्या ॲक्शन मसाला चित्रपट बाघी ३ मध्ये रितेश देशमुखची वर्णी लागली आहे. या सिनेमात रितेश देशमुख टायगर श्रॉफच्या भावाची तसेच खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचे कळते. बागी ३ मध्ये टायगर श्रॉफच्या जोडीला श्रद्धा कपूर ही अभिनेत्री झळकणार आहे. सिनेमाचे निर्माते साजिद नाडियादवाला यांच्यासोबत रितेश देशमुखचा हा सहावा बॉलीवूड सिनेमा आहे. बागी ३ मध्ये रितेश देशमुखसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे श्रद्धा कपूर या अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहे. बहुप्रतीक्षित असा बागी ३ सिनेमा पुढच्या वर्षी ६ मार्च २०२० ला संपूर्ण भारतात तसेच जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar