बिग बॉस सीजन २ आणि कोण होणार करोडपतीची तारीख जाहीर... वाचा येथे

BIG BOSS MARATHI SEASON 2

 सुपरहिट पहिल्या सीजन नंतर आता 'बिग बॉस मराठी' चा दुसरा सीजन आपल्या भेटीला येत आहे. 'बिग बॉस सीजन २' च्या प्रोमोज ने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. या पर्वामध्ये कोण कोणते कलाकार पाहायला मिळणार याबद्दल अफवा धुमाकूळ घालत आहेत. परंतु अद्यापही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. तत्पूर्वी या शोचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. बिग बॉस सीजन २ चे शीर्षकगीत म्हणजेच रॅप देखील प्रदर्शित झाला आहे आणि याचबरोबर बिग बॉस सीजन २ केव्हापासून सुरू होणार याची तारीख देखील जाहीर झाली आहे. बहुप्रतिक्षित असा 'बिग बॉस मराठी सीजन २' चा ग्रॅंड प्रिमिअर सोहळा २६ मे रोजी कलर्स मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे.
 तर दुसरीकडे सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' चे नवीन पर्व सुरू होणार आहे. या नवीन पर्वाचे सूत्रसंचालन करण्यासाठी आघाडीचे दिग्दर्शक 'नागराज मंजुळे' यांची निवड करण्यात आली आहे. या शोच्या शीर्षकगीताचे रॅप देखील प्रदर्शित झाले आणि ते प्रेक्षकांना भावले सुद्धा. एप्रिल मध्ये सुरु होणारे 'कोण होणार करोडपती' चे नवीन पर्व काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आले आणि आता नवीन तारीख जाहीर झाली आहे. 'कोण होणार करोडपती' चे नवीन पर्व सोनी मराठी वाहिनीवर २७ मे पासून रात्री ८.३० वाजता आपल्या भेटीला येणार आहे. दोन नवीन करकरीत मराठी शोज एकाच आठवड्यात येणार असल्यामुळे प्रेक्षकांसाठी मेजवानीच आहे.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar