रंपाट सिनेमातील अभिनेत्री कश्मिरा परदेसी अक्षय कुमारच्या चित्रपटात.. वाचा संपूर्ण बातमी

RAMPAAT FAME KASHMIRA PARDESI WILL BE SEEN WITH AKSHAY KUAMR

 

 

 

 अनेक मराठी अभिनेत्रींने हिंदी सिनेमांमध्येही मोठे नाव कमावले आहे आणि म्हणूनच अनेक बॉलीवूड निर्मात्यांचा कल मराठी अभिनेत्री आपल्या सिनेमात घेण्याकडे असतो. रवी जाधव दिग्दर्शित "रंपाट" सिनेमातून अभिनेत्री 'कश्मिरा परदेसी' हिने मराठी सिनेमासृष्टीत पदार्पण केले. हा एक मराठी चित्रपट केल्यानंतर लगेच ती आता एका बॉलिवूड चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'रंपाट' सिनेमात 'मुन्नी' ही व्यक्तिरेखा साकारल्यानंतर कश्मिरा परदेशी आता अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या "मिशन मंगल"या  सिनेमात एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

 

 

 

 

 

 मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या "रंपाट" सिनेमाला तितकेसे यश लाभले नाही परंतु या सिनेमातील कश्मिरा परदेसीने साकारलेल्या भूमिकेचे बर्‍यापैकी कौतुक झाले. यानंतर लगेचच मिशन मंगल सारख्या मोठ्या आणि मल्टिस्टारर सिनेमांमध्ये तिला भूमिका मिळाल्यामुळे तिची लॉटरी लागली आहे असे म्हणायला हरकत नाही. "मिशन मंगल" या सिनेमामध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू, किर्ती कुल्हारी अशी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांची भट्टी जमून आली आहे. आणि या दिग्गज आणि लोकप्रिय कलाकारांसोबत कश्मिरा परदेसी स्क्रिन शेअर करणार असल्यामुळे मराठी अभिनेत्र्यांच्या यादीत आणखीन एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. अवकाश संशोधनातील भारताच्या एका उल्लेखनीय कामगिरी वर आधारित, १५ अॉगस्ट २०१९ ला प्रदर्शित होणाऱ्या "मिशन मंगल" या सिनेमाची आतापासूनच उत्सुकता लागून राहिली आहे

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar