अभिनेत्री नेहा पेंडसेने दिलं या प्रश्नावर सडेतोड उत्तरं.

NEHA PENDSE

अभिनेत्री नेहा पेंडसे ५ जानेवारी २०२०  रोजी व्यावसायिक शार्दुल सिंह बयाससोबत मराठमोळ्या पद्धतीने पुण्यात लग्नबंधनात अडकली. लग्न होऊन अवघे चार दिवसच झाले आहेत. पण सोशल मीडियावर  नेहाच्या लग्नाबद्दल वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत. दोनवेळा घटस्फोट घेतलेल्या शार्दुलसोबत नेहाने का लग्न केलं? असा सवाल विचारला जात आहे.

हेही वाचा : नेहा पेंडसेचा नवरा शार्दुल सिंह विषयी हि गोष्ट माहित आहे का ? वाचा संपूर्ण बातमी.

 

 या व्यक्तीशी नेहाने लग्न का केलं ?  असा प्रश्न तिला एका मुलाखतीत विचारण्यात आला यावर नेहा म्हणते की,'मला कळतं नाही,  लोक फक्त शार्दूलच्या घटस्फोटांविषयी का बोलत आहेत? मीसुद्धा काही व्हर्जिन नाही. उलट शार्दूलने त्याचं प्रेम असलेल्या व्यक्तींशी लग्न तरी केलं. माझ्याबाबतीत तर लग्नाआधीच मुलांनी नातं मोडलं. कमीत कमी शार्दूलने कमिटमेंट तरी दिली होती, असं अभिनेत्री नेहा पेंडसेने सांगितलं आहे.

 

हेही वाचा :  ‘काळ’ चित्रपटाचा थरारक अनुभूति देणारा ट्रेलर प्रदर्शित...

यात काय मोठा विषय आहे? आजकाल करिअरला प्राधान्य देऊन अनेकजण उशिरा लग्न करतात. पण लग्नाआधी ते एकापेक्षा अधिक रिलेशनशिपमध्ये असतात. या रिलेशनशिपमधलं प्रेम, एकनिष्ठता, शारीरिक प्रेमाची गरज ही तेवढीच असते. फक्त त्यावर कायदेशीर ठपका नसतो, असं नेहा पेंडसे म्हणाली आहे.

 

हेही वाचा : समीर पाटील दिग्दर्शित 'भाऊबळी' या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित.

 

दोन लग्नांमध्ये अपयश मिळाल्यानंतर लग्नसंस्थेवर विश्वास कायम ठेवणं काही सोपं नाही. यावरुन कळतं की त्या व्यक्तीला लग्नाचं किती महत्त्व आहे, असंही नेहाने म्हटलं आहे.

 

Tags

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar