वडिलांच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखने शेअर केला हा व्हिडीओ.

महाराष्ट्राचे  माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज ७५ वी जयंती सर्वसमावेशक आणि बेधडक अशी विलासराव यांची ओळख. आजच्या राजकीय परिस्थितीत विलासराव हवे होते,  असे म्हणणारे लोक आजही आहेत. दरवर्षी बाभळगाव येथे विलासराव यांची जयंती साजरी केली जाते पण सध्या लॉकडाऊनमूळे शक्य नाही.   

 

 

 

अभिनेता  रितेश देशमुखने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त एका हृदयस्पर्शी व्हिडिओतून चाहत्यांना आपल्या वडिलांची भेट घडवून आणली. विलासरावच्या आभासी स्पर्शाने रितेशलाही मन भरून आल्याचं दिसून येतेय. 

 

 

या व्हिडिओत रितेश वडिलांच्या जॅकेटला स्पर्श करून न्याहाळत आहे. त्या जॅकेट मधून त्याचा हात बाहेर येतो. आणि रितेशचा डोक्यावरून मायेने हात फिरतो, त्याची पाठ थोपटतो. असा एक क्रिएटिव्ह व्हिडीओ रितेशने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहताना प्रत्येकाचं  मन आणि डोळे भरून येतील यात शंका नाही . चाहत्यांनी देखील व्हिडीओवर कंमेंट्स मधून भावना व्यक्त केल्या आहेत. बापलेकांचं नातं किती घट्ट होत हे ह्या व्हिडीओ मधून दिसून येतेय. 

Tags

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar