अंकुश चौधरी आणि अमृता खानविलकर झळकणार रंपाटच्या गाण्यात... पहा झलक येथे

RAMPAAT SONG POSTER

 प्रदर्शनापूर्वीच चर्चेत राहिलेला सिनेमा म्हणजे रवी जाधवचा आगामी सिनेमा "रंपाट". या चित्रपटाचे मुख्य नायक आणि नायिका यांच्या परिचयाचे प्रोमो आपण नुकतेच पाहिले. अभिनय बेर्डेचा मिथुन आणि कश्मिरा परदेशीचा मुन्नी हे दोन्ही टीचर प्रोमो पाहून या सिनेमात त्यांच्या स्वप्नांची पूर्ती करण्याचा प्रवास पाहायला मिळेल असा अंदाज बांधता येतो. या दोन टीजर नंतर सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होणे अपेक्षित होते परंतु 'झी स्टुडिओज' ने काही वेगळा बेत आखला आहे. ट्रेलर आधी या सिनेमातील "आईच्यानं रं" हे गाणे प्रदर्शित होणार आहे. पहा या गाण्याचा प्रोमो या लिंकवर ==> https://www.instagram.com/p/BwKTGCpFueH/?utm_source=ig_web_copy_link

 या गाण्यांमध्ये 'अभिनय बेर्डे' म्हणजेच मिथुन आणि 'कश्मिरा परदेशी' म्हणजेच मुन्नी झळकणार आहेत. या सिनेमातील कलाकारांनी सोशल मीडियावर प्रोमो पोस्ट करत लिहिले की सिनेमाचा पहिला करण्यात येत आहे या सोमवारी काही 'रंपाट' सरप्राईज घेऊन.. आणि हे सरप्राईज म्हणजेच सुपरस्टार 'अंकुश चौधरी' आणि ग्लॅमरस अभिनेत्री 'अमृता खानविलकर' हे दोघेही या गाण्यात झळकणार आहेत. या छोट्याशा प्रोमोमध्ये या दोघांची एक झलक दाखवण्यात आली आहे आणि या दोघांची झलक गाण्यायाबद्दलची उत्सुकता वाढवण्यासाठी पुरेशी ठरली आहे. अभिनय-कश्मिरा या जोडी सोबतच अंकुश-अमृता या दोघांच्या समावेशामुळे या गाण्यात एक वेगळीच रंगत येणार आहे नक्की तर वाट पाहूया या काढण्याच्या प्रदर्शित होण्याची म्हणजेच सोमवारची.

Read Next...


Featured News

Read something similar