रितेश देशमुखने मागितली माफी. जाणून घ्या त्या मागचे कारण.

Riteish Deshmukh


अभिनेता रितेश देशमुख, रवी जाधव, तेजपाल वाघ, विश्वास पाटील यांनी रायगडावर शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित
पुतळ्यासोबत काढलेला फोटो सोशल मीडिया वर टाकला. मात्र ते दृश्य बघून शिवभक्त नाराज झाले आणि बघता बघता त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटायला सुरुवात झाली.


याप्रकरणात रितेशने माफी मागितली. फेसबुकवर केलेल्या एका पोस्टमधून त्याने सर्व शिवभक्तांची माफी मागताना कोणालाही दुखावण्याचा आमचा हेतू
नसल्याचे सांगितले.

रितेशने लिहिलेल्या पोस्टमध्ये तो म्हणतो की,

“आपल्या सर्वांचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वापासून प्रेरणा घेण्यासाठी नुकताच रायगड किल्ल्यावर जाण्याचा योग आला. सर्व शिवभक्तांप्रमाणे मी ही इथल्या वातावरणाने भारावून गेलो होतो.

त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांच्या पुतळ्याला हार घालून वंदन केलं. आजन्म ज्यांच्या पायावर डोकं ठेवलं त्यांच्या पायापाशी कृतज्ञ होऊन बसण्याची इच्छा अनेक वर्षांपासून होती.

तिथे बसून आम्ही काही छायाचित्रे घेतली आणि ती सोशल माध्यमातून पोस्ट केली. यामागे फक्त भक्तिभाव होता. ती छायाचित्र घेताना किंवा तिथे बसताना आमच्या मनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र आमच्या या कृत्यामुळे कोणीही दुखावलं असेल तर त्याची आम्ही अंतःकरणपूर्वक माफी मागतो.”

सध्या रितेश शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याच्या  तयारीत आहे आणि याच निमित्ताने त्याने रायगडाला भेट दिली होती. 

Read Next...


Featured News

Read something similar