सेक्रेड गेम्समध्ये गायतोंडेच्या वडिलांची भूमिका साकारलेले अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचे दुःखद निधन.

जेष्ठ अभिनेते रामचंद्र धुमाळ यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, ख्वाडा, टाइमपास, सैराट अशा शंभरहून अधिक मराठी व हिंदी चित्रपटात त्यांनी चरित्र भूमिका साकारल्या. भारतातील  नावाजलेली वेबसीरिज सेक्रेड गेम्समध्ये  गायतोंडेच्या वडिलांची  रामचंद्र धुमाळ यांनी भूमिका साकारली होती. 

 

 

 

 

पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७१ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून  त्यांची प्रकृती ठिक नव्हती.  चित्रपट क्षेत्रात 'धुमाळ काका' या नावाने ते परिचित होते. नवीन कलाकारांचे ते मार्गदर्शक होते. नवीन कलाकारांना ते हक्काचे आणि मायेचे व्यक्तिमत्त्व वाटे.

 

Tags

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar