उमेश-प्रिया जोडी ६ वर्षानंतर एकत्र काम करणार.. वाचा संपूर्ण माहिती

UMESH AND PRIYA KAMAT TO COME TOGETHER AFTER 6 YEARS

 

 

 

 उमेश कामत आणि प्रिया बापट या दोन्ही कलाकारांनी वैयक्तिक पातळीवर मराठी सिनेमासृष्टीत त्यांच्या वैविध्यपूर्ण कामाने चांगले नाव कमावले आहे. त्यांची जोडी म्हणजे मराठी सिनेमासृष्टीतील सेलिब्रिटी कपल्स मधली एक आवडती आणि लोकप्रिय जोडी. उमेश आणि प्रिया या दोघांनी २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या टाईम प्लीज या सिनेमात एकत्र काम केले होते. या सिनेमांमधील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडला आणि हा सिनेमा हिट झाला. यानंतर प्रिया बापट एक निर्माती म्हणून आणि उमेश अभिनेता म्हणून "दादा एक गूड न्यूज आहे" या नाटकासाठी एकत्र आले. मात्र दोघांनी एकत्र काम करण्याची संधी मिळाली नाही. आणि आता ६ वर्षानंतर उमेश-प्रिया प्रेक्षकांची लाडकी जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे.
 
 
 
 
 
 
 MX Player वर प्रदर्शित होणारी "आणि काय हवं" या वेबसिरीज मध्ये उमेश आणि प्रिया ही जोडी एकत्र काम करणार आहे. या वेब सिरीज मध्ये देखील हे दोघे नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसणार आहेत. जुई आणि संकेत या दोन भूमिकांच्या नातेसंबंधांवर आधारित या वेबसाईटचे दिग्दर्शन 'मुरांबा' फेम 'वरूण नार्वेकर' यांनी केले आहे. पुढील आठवड्यात म्हणजेच १६ जुलै २०१९ पासून "आणि काय हवं" ही वेबसिरिज MX प्लेयर प्रेक्षकांसाठी मोफत मध्ये उपलब्ध होणार आहे. तर मग आपल्या लाडक्या उमेश-प्रिया जोडीला एकत्र पहायची संधी चुकवू नका.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar