हिंदी सिरीअल्सचे मराठी रिमेक...

Hindi Serial's Marathi Remake


मराठी मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण विषय आतापर्यंत हाताळले गेले आहेत. बऱ्याच वेळेला मराठी मालिका ह्या विशिष्ट साच्यात अडकताना दिसल्या. परंतु मराठी मालिकांची हि विशिष्ट साचेबद्ध मांडणी मोडण्याचा प्रयत्न वेळोवेळी मराठी लेखक-दिग्दर्शकांनी केला आणि याचसाठी बहुतेकवेळा हिंदी मालिकांची मदत देखील घेण्यात आली. मूळ हिंदी मालिकांच्या संकल्पना घेऊन त्यात मराठी प्रेक्षकांना रुचणारे बदल करून काही मालिका मराठीमध्ये नव्याने सादर केल्या गेल्या. मराठी बॉक्स ऑफिस अश्याच काही मालिकांची यादी तुमच्यासमोर सादर करत आहे.

१)     माधुरी मिडलक्लास

मराठीमध्ये हिंदी मालिकांचे सर्वाधिक रिमेक हे स्टार प्रवाह या वाहिनीवर आले आहेत. माधुरी मिडलक्लास हि मालिका साराभाई vs साराभाई या लोकप्रिय हिंदी मालिकेचा अधिकृत रिमेक होता. किशोरी गोडबोले, ज्योती मालशे, राहुल पेठे आणि अतुल परचुरे यांच्या या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका होत्या.
२)     असावा सुंदर स्वप्नांचा बंगला  

कलर्स मराठीवरील गाजलेली असावा सुंदर स्वप्नांचा बंगला हि मालिका 'उतरण' या हिंदी मालिकेशी प्रेरित होती.३)     पुढचं पाऊल
 
स्टार प्रवाहवरील पुढचं पाऊल हि मालिका 'साथ निभाना साथिया' या हिंदी मालिकेवर आधारित होती. या मालिकेमध्ये हर्षदा खानविलकर ह्यांनी साकारलेल्या अक्कासाहेबांच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती.

४)     देवयानी

देवयानी या मराठी मालिकेचं कथानक 'मन कि आवाज प्रतिज्ञा' या हिंदी मालिकेवर आधारित होतं. इतर मालिकांच्या TRP च्या तुलनेत हि मालिका तेव्हा अग्रस्थानी होती. संग्राम आणि देवयानीची जोडी चांगलाच भाव खाऊन गेली होती.
५)       मानसीचा चित्रकार तो

स्टारप्लसच्या 'दिया और बाती हम' या हिंदी मालिकेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेऊन 'मानसीचा चित्रकार तो' या मालिकेची निर्मिती करण्यात आली होती पण हिंदी मालिकेएवढा चांगला प्रतिसाद या मराठी मालिकेला मिळू शकला नाही.

६)       मड्डम सासू धड्डम सुन

मड्डम सासू धड्डम सुन हि मालिका 'तूतू मैमै' या मालिकेचा रिमेक होता. रीमा लागू आणि सुप्रिया पिळगांवकर यांनी साकारलेल्या सासू सुनेच्या जोडीने सर्वानाच खळखळून हसवले होते. मराठीमध्ये वर्षा उसगांवकर आणि हेमांगी कवी यांनी देखील या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले होते.
 ७)       हम तो तेरे आशिक है
हम तो तेरे आशिक है हि मालिका 'भाभीजी घर पे है' या मालिकेवर आधारित असून मूळ हिंदी मालिकेत गाजलेली अंगुरी भाभीची भूमिका मराठीमध्ये 'दीप्ती केतकर' हिने साकारली आहे.

८)      नकळत सारे घडले

नकळत सारे घडले हि मराठी मालिका एकता कपूरच्या 'ये है मोहब्बते' या हिंदी मालिकेवर आधारित असून या मालिकेची निर्मिती आपल्या सर्वांचा लाडका चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी यांनी केली आहे.


Read Next...


Popular News
Featured News

Read something similar