बंदिस्त पिंजरा तोडून 'गर्ल्स' आल्या सर्वांसमोर- गर्ल्स चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित.

GIRLZ

'आपला आपल्यावर कॉन्फिडन्स असला पाहिजे, जग गेले तेल लावत'.असं म्हणणाऱ्या 'गर्ल्स' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. 'गर्ल्स' हा या वर्षातला बहुप्रतीक्षित चित्रपट आहे. 'गर्ल्स' चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासूनच चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता दिसून येत होती. पहिले गाणे आणि  चित्रपटाचा टिझर पाहून ही उत्सुकता अधिकच वाढली होती. प्रेक्षकांना ज्या ट्रेलरची प्रतीक्षा होती त्या 'गर्ल्स' चित्रपटाचा ट्रेलर आल्यामुळे आता ही उत्सुकता आणखी शिगेला पोहचली आहे.  

हेही वाचा : 'खारी बिस्कीट' सिनेमाला आयएमडीबीवर मिळाले सर्वात जास्त रेटिंग्स

मती, रुमी, मॅगी या तीन वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या आणि वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या मुली त्यांचे दैनंदिन आयुष्य जगत असताना एका वळणावर जेव्हा त्या एकत्र येतात तेव्हा, त्या तिघींची एकमेकींशी होणारी ओळख, आयुष्याकडे बघण्याची नव्याने मिळालेली नजर, नवीन विचार, नातेसंबंध आणि मुख्य म्हणजे त्यांची होणारी घट्ट मैत्री. या गोष्टीवर भाष्य करणारा हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणारा आहे. 'दोस्तीत कधी मतलबी व्हायचे नसते, तर त्या दोस्तीचा मतलब शोधायचा असतो'. या संवादातूनच मैत्रीचा खरा अर्थ सांगणाऱ्या या चित्रपटातून माणसाच्या जीवनात असणाऱ्या प्रत्येक नातेसंबंधावर प्रकाश टाकण्यात आला आहे. हा चित्रपट पाहून आपली आपल्याच आई वडिलांशी नव्याने ओळख होणार आहे.

हेही वाचा : सोनाली कुलकर्णीची मध्यवर्ती भूमिका असलेला ‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित.

'बॉईज' आणि 'बॉईज २' सारख्या चित्रपटातून रसिकांचे पुरेपूर मनोरंजन करणारे  दिग्दर्शक विशाल देवरुखकर आपल्या हॅट्रिक असणाऱ्या सिनेमातून मुलींच्या खासगी आणि बंदिस्त आयुष्याला सर्वांसमोर आणले आहे. आतापर्यंत मुलींमध्ये होणारे संभाषण, संवाद फारसे कोणाला माहित नव्हते पण आता 'गर्ल्स' पाहिल्यानंतर हे 'गर्ल्स टॉक' तुम्हाला नक्कीच कळतील. 'आपल्याला बंदिस्त केलेल्या पिंजऱ्याला तोडायचे आणि आपण स्वतःहून शिरलेल्या पिंजऱ्याला सोडायचे', आणि आपल्या मनाप्रमाणे आपले आयुष्य एकदातरी  जगत स्वतःला मोकळा श्वास घेऊ द्यायचा.

हेही वाचा : अभिनेता 'श्रेयस तळपदे' पुन्हा करणार हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन.

 

या चित्रपटात अंकिता लांडे, केतकी नारायण, अन्विता फलटणकर, देविका दफ्तारदार, पार्थ भालेराव, अतुल काळे, अमोल देशमुख, सुलभा आर्या, किशोरी अंबिये यांच्या व्यतिरिक्त अनेक कलाकार दिसणार आहेत.  येत्या २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या आणि 'एव्हरेस्ट एंटरटेनमेंट', 'कायरा कुमार क्रिएशन्स' प्रस्तुत आणि 'अ कायरा कुमार क्रिएशन्स प्रॉडक्शन'च्या अंतर्गत 'गर्ल्स' या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले असून निर्मिती नरेन कुमार यांनी केली आहे. तर चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले असून अमित भानुशाली यांनी सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले आहे.

 

Tags

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar