अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटात दिसणार हे दोन मराठी कलाकार.

AMITABH BACHCHAN

 बिग बी अमिताभ बच्चन सध्या आता त्यांचा  आगामी चित्रपट "झुंड" च्या शुटींग मध्ये व्यस्त आहेत. फँड्री , सैराट, नाळ यांसारख्या दमदार चित्रपटानंतर नागराज मंजुळे पुन्हा एक नवा चित्रपट आपल्या समोर घेऊन येत आहे. 'झुंड' या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले असून.  अजय - अतुल या मराठमोळ्या जोडीने चित्रपटातील संगीताची बाजू सांभाळली आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग नागपूरमध्ये चालू आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या इंस्टाग्राम वरून नागपूरच्या शूटिंगच्या वेळचे काही फोटोज देखील शेअर केले आहेत. 

हेही वाचा : ग्लॅमरस अभिनेत्री "सई ताम्हणकर" उचलतेय एक धाडसी पाऊल.

हेही वाचा : 'उतरंड' या लघुपटाचे निर्माते मराठी सिनेसृष्टीत घेऊन येतायत विनोदी कमर्शिअल सिनेमा.

तसेच या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा बरोबर एक सुपरहिट जोडी दिसणार आहे ती म्हणजे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर. या चित्रपटात आकाश आणि रिंकू हे दोघे  फुटबॉल प्लेअरच्या भूमिकेत दिसणार आहे. खरतर बऱ्याच दिवसानंतर ही जोडी पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहे. 

 

हेही वाचा : शूटिंगसाठी मुहूर्तच मिळेना - सारंग साठ्ये

या चित्रपटात आणखी कोण कोण कलाकार असणार आहे ? हे अद्याप गुपित ठेण्यात आले.  सैराटमधील आर्ची आणि परश्या या जोडीला पुन्हा या चित्रपटात बघण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असणार आहेत. लवकरच हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

 

 
 
 

Tags

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar