सैराट, कागर आणि मेकअप नंतर रिंकू राजगुरूचा चौथा मराठी सिनेमा.. वाचा संपूर्ण माहिती

RINKU RAJGURU

 सैराट सिनेमाच्या यशानंतर प्रकाशझोतात आलेली रिंकू राजगुरू सध्या खूपच आनंदात आहे. नुकताच तिचा बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत तिने भव्य यश मिळवत ८२% गुण संपादित केले. सैराट आणि कागर या दोन सिनेमाच्या यशानंतर रिंकू राजगुरु आता आपल्या तिसरा सिनेमा साठी सज्ज झाली आहे ज्याचे नाव आहे "मेकअप". "सैराट" आणि "कागर" या दोन्ही सिनेमात तिने गावाकडील मुलीच्याच म्हणजेच आर्ची आणि राणी या दोन भूमिका साकारल्या होत्या. तर आता तिसऱ्या सिनेमात म्हणजेच मेकअप या सिनेमात ती एकदम विरोधी भूमिका म्हणजेच मॉडर्न मुलगी साकारत आहे. याशिवाय ती नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन सोबत झळकणार आहे.  नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना रिंकू राजगुरूने सैराट, कागर आणि मेकअप नंतरच्या चौथ्या सिनेमाचा देखील उल्लेख केला. यावर सांगताना रिंकू राजगुरु म्हणाली की, "लवकरच मी माझ्या चौथ्या मराठी सिनेमाची घोषणा करणार आहे. हा सिनेमा अॅसिड हल्ल्याने पिडीत झालेल्या मुलीच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात मी कोणती भूमिका साकारणार याबद्दल आत्ता नाही बोलू शकत. पण वेळ आल्यावर मी नक्की सांगेन."  आतापर्यंत केलेल्या चित्रपटांमध्ये रिंकू राजगुरूने आधीच्या सिनेमापेक्षा वेगळी भूमिका साकारली आहे. यातून तिच्या कामातील वैविध्यता दिसून येते. आणि आता अॅसिड हल्ल्याने पीडित मुलीच्या जीवनावर आधारित असलेला संवेदनशील विषय निवडल्याबद्दल रिंकू राजगुरुचे कौतुक करायलाच हवे. प्रेक्षकांमध्ये देखील तिला एका वेगळ्या रूपात पाहण्यासाठी उत्सुकता असेलच.

Read Next...


Featured News

Read something similar