राधिका आपटे.. आली लहर, केला कहर!

Radhika Apte

राधिका आपटे हे सिनेसृष्टीतील एक मोठं नाव आहे. तिच्या उत्तम अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.
 नेहमीच काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्या राधिकाने हिंदी चित्रपटांमध्ये मध्ये बोल्ड सीन्ससुद्धा दिले आहेत.
 काही महिन्यांपूर्वी तिचा एक न्यूड विडिओ देखील व्हायरल झाला होता.

सतत चर्चेत असलेली ही अभिनेत्री नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नेटफ्लिक्सच्या सॅक्रेड गेम्सच्या पहिल्या सीझन मध्ये देखील झळकली
 होती ज्यात नवाझुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका होती.

अलीकडे, म्हणजेच २४ ऑगस्ट रोजी, नेटफ्लिक्सने घुल नावाची एक हॉरर थ्रिलर वेबसिरीज प्रदर्शित केली आहे ज्यात राधिका आपटे
 प्रमुख भूमिकेत आहे.

राधिकाला नेटफ्लिक्सच्या या शो मध्ये बघून अनेक प्रेक्षेकांना 'इंडस्ट्री मध्ये दुसरी कोणती हिरोइन आहेका नाही' असा प्रश्न पडलाय?

राधिका हे दोन शोज वगळता नेटफ्लिक्सच्या लस्ट स्टोरीज मध्ये देखील सैराट फेम आकाश ठोसर बरोबर दिसली होती.

राधिकाचं सतत नेटफ्लिक्स वर झळकणं आता हास्याचा विषय बनला आहे  अभिनेत्रीला नेटीझन्स ट्रोल करताना दिसत आहेत.

राधिकाच्या मिम्स आणि GIFs नी सोशल मीडिया भरून गेलं आहे.(1)(2)(3)

लोकं तर नेटफ्लिक्स आणि राधिका मध्ये प्रेम प्रकरण असल्याचे स्टेटस आपल्या सोशल मीडिया वरटाकत आहेत.

नेटफ्लिक्स, पण खरंच आता राधिकाचा अतिरेक झाला आहे असं आमहाला देखील वाटतं.

इंडस्ट्रीमध्ये अनेक चांगले नट आहेत, कधीतरी त्यांना सुद्धा संधी मिळावी अशी आम्ही प्रार्थना करतो!

राधिका, तुला पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

Read Next...


Featured News

Read something similar