मुळशी पॅटर्नच्या यशानंतर सरसेनापती हंबीरराव मोहिते चित्रपट करणार प्रविण तरडे

PRAVIN TARDE
 नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला "मुळशी पॅटर्न" हा सिनेमा आपल्या सर्वांना आठवत असेलच. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन या सर्व बाजूंची धुरा 'प्रविण तरडे' यांनी यशस्वीरित्या सांभाळली. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती तर मिळालीच आणि त्यासोबतच व्यावसायिक यश देखील मिळाले.  "मुळशी पॅटर्न" च्या यशानंतर 'प्रविण तरडे' यांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर त्यांच्या पुढील चित्रपटाची घोषणा केली आहे.


  शिवजयंती निमित्ताने एका कार्यक्रमात अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक 'प्रविण तरडे' यांनी एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे. "छत्रपती शिवाजी महाराजां" चे विश्वासू "सरसेनापती हंबीरराव मोहिते" यांची कथा या सिनेमात आपल्याला पाहायला मिळेल असे त्यांनी सांगितले. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि संभाजी महाराजांचा राज्याभिषेक या दोन्ही गोष्टी रुपेरी पडद्यावर आपल्याला पाहायला मिळतील असेही ते म्हणाले. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. Link -> https://www.facebook.com/pravin.tarde.9/videos/2244099405611322/

 या चित्रपटात 'रमेश परदेशी', 'देवेंद्र गायकवाड', 'श्रीपाद चव्हाण' 'सुनील पालकर', 'प्रतीक मोहिते पाटील' ह्याच्यासोबत अनेक कलाकार आपल्याला पाहायला मिळतील. या सिनेमात मुख्य भूमिकेत म्हणजेच "हंबीरराव मोहिते" यांच्या भूमिकेत कोणता कलाकार पाहायला मिळणार याची घोषणा शिवराज्याभिषेकाच्या दिवशी म्हणजेच ६ जून २०१९ रोजी करण्यात येईल. या चित्रपटाची कथा, संवाद, पटकथा आणि दिग्दर्शन या सर्व बाजूंची जबाबदारी प्रविण तरडे स्वत: सांभाळणार आहेत. ऐतिहासिक आणि बिग बजेट असा "सरसेनापती हंबीरराव मोहिते" या सिनेमा जानेवारी २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar