आदित्य सरपोतदार करणार शोले वर आधारित वेब सिरीज... वाचा संपूर्ण बातमी....

ADITYA SARPOTDAR
 
 हल्लीच्या पिढीला डिजिटल जगतामध्ये खूपच रस आहे. चित्रपट lगृहात सिनेमा पाहण्यापेक्षा मोबाइल आणि डिजिटल माध्यमांतून एखादा सिनेमा किंवा मालिका पाहणे ते जास्त पसंत करतात. म्हणूनच आता हिंदी आणि मराठीमध्ये वेबसिरीज बनण्याचे प्रमाण वाढले आहे. "क्लासमेट्स" आणि "फास्टर फेणे" सारखे सुपरहिट मराठी चित्रपट देणारे दिग्दर्शक 'आदित्य सरपोतदार' देखील याला अपवाद नाहीत. लवकरच 'आदित्य सरपोतदार' यांची "शोले" वर आधारित हिंदी वेब सीरीज आपल्या भेटीला येत आहे.

 या वेबसिरीजचा "शोले" या अजरामर चित्रपटाशी संबंध असा की या चित्रपटात अभिनेत्री 'हेमा मालिनी' यांची साहसदृश्ये साकारणारी स्टंट वुमन म्हणजेच "रेश्मा पठाण" यांच्या जीवनावर ही वेबसीरीज आधारित आहे. बॉलीवूड मधील पहिली स्टंट वुमन म्हणून नावलौकिक मिळवलेल्या "रेश्मा पठाण" यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये स्टंट वुमन म्हणून साहसदृश्य केली आहेत. याची झलक या वेबसिरीजच्या टीजर मध्ये पाहायला मिळते. पहा हा टिजर येथे. 


 या वेबसाईट मध्ये 'रेश्मा पठाण' ची भूमिका 'बिदिता बाग' ही अभिनेत्री साकारणार आहे. तर याची निर्मिती 'सई आनंद' आणि 'शक्ती आनंद' यांच्या 'पर्पल मॉर्निंग मूव्हीज' यांनी केली आहे. 'आदित्य सरपोतदार' दिग्दर्शित "द शोले गर्ल" हि वेबसिरिज महिला दिनाच्या निमित्ताने म्हणजेच ८ मार्चला ZEE5 अॅप आणि यूट्यूब चैनल वर उपलब्ध होईल...

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar