संजय दत्तच्या पहिला मराठी सिनेमा "बाबा" चा टीझर पहा येथे...

MARATHI MOVIE BABA TEASER

 

 

बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच 'संजय दत्त' यांनी त्यांच्या पहिल्या वाहिल्या मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाचे नाव "बाबा" असे आहे. संजय दत्त व मान्यता दत्त निर्मित, संजय दत्त प्रोडक्शन्स आणि ब्ल्यू मस्टंग क्रिएशन्स प्रस्तुत "बाबा" या मराठी सिनेमात अनेक मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध सहाय्यक अभिनेता दीपक' डोब्रियाल' देखील या सिनेमातून मराठी सिनेमामध्ये पदार्पण करत आहे. मराठीतील अनेक नावाजलेले कलाकार या सिनेमात आहेत. 'अभिजीत खांडकेकर', 'स्पृहा जोशी', 'नंदिता धुरी', 'शैलेश दातार', 'जयवंत वाडकर' अशा अनुभवी कलाकार यांची भट्टी या सिनेमात जमून आली आहे. भावनेला भाषा नसते अशी भावस्पर्शी टॅगलाईन असलेला हा सिनेमा बाप-मुलाच्या भावनिक नात्यावर आधारित आहे. संजय दत्त सारख्या सुपरस्टारने असा विषय घेऊन मराठी सिनेमात पदार्पण केले याचे कौतुक करावेच लागेल. "बाबा" हा सिनेमा २ ऑगस्ट २०१९ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. बहुप्रतीक्षित असा या सिनेमाचा पहिला टीझर आपल्या भेटीला आला आहे, पहा हा टीझर येथे...

 

 

 

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar