हा कलाकार आहे पार्टी चित्रपटातील पहिला चेहरा!

Suvrat Joshi

सुरुवातीपासूनच 'पार्टी', या आगामी चित्रपटाचा टीझर पोस्टर चर्चेचा विषय बनला आहे. कलाकारांचे चेहरे या टीझर पोस्टरवर लपवण्यात आले असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल
प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.

आता हळू हळू या कलाकारांचे चेहरे समोर येऊ लागले आहेत. यंग अँड डॅशिंग सुव्रत जोशी हे या चित्रपटात असलेल्या ५ कलाकारांमधील पाहिलं नाव.
सुव्रतने याआधी 'शिकारी' या चित्रपटात काम केले असून 'पार्टी' हा सुव्रतचा दुसरा मराठी चित्रपट आहे. सुव्रतने नुकतेच सोशल मीडियावर 'पार्टी' या चित्रपटाबद्दल पोस्ट करून हि बातमी त्याच्या चाहत्यांना दिली. 

मी खूप खूष आहे की माझ्या नालायक स्वभावाला सांभाळून घेणारे... मी माती खाऊनही मला चहा पाजणारे... मी पैसे बुडवून पळून 
गेलो तरी माझी पाठ राखणारे मित्र मला मिळाले...ते माझ्यावर प्रेम करतात याचा मी गैरफायदा आयुष्यभर घेईनंच!
मी मित्र म्हणून कसाही असलो तरी चांगला मित्र असल्याचा अभिनय करता येतोचतसा मी केलाय आणि तो बघायला आता 
तुम्हाला यायचं आहेमाझा नवा चित्रपट..”

-      सुव्रत जोशी

सूप्रसिद्ध कथा-पटकथा लेखक, सचिन दरेकर, या चित्रपटानिमित्त पहिल्यांदाच दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार असून,
नवविधा प्रोडक्शन प्रस्तुत आणि 'बकेट लिस्ट' सिनेमाचे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्स यांच्या सौजन्याने जितेंद्र चीवेलकर
जमाश्प बापुना आणि अमित पंकज पारीख यांची निर्मिती असलेल्या 'पार्टी' या सिनेमात, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश आहे.

येत्या २४ऑगस्ट पासून प्रेक्षकांना या पार्टी चा आनंद लुटता येणार आहे.

Read Next...


Featured News

Read something similar