पुष्कर जोग करणार बिग बॉस मराठी सीजन २ वर नवीन शो... वाचा शो बद्दलची संपूर्ण माहिती..

BIG BOSS MARATHI 2
 बिग बॉस मराठी सीजन नंबर २ सुरू होऊन आता आठवडा होत आला आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या १५ स्पर्धकांनी बिग बॉस मराठी सीजन २ च्या घरात दिमाखात प्रवेश केला आहे. गेल्या चार-पाच दिवसात या घरात वेगवेगळे नाट्य बघायला मिळत आहेत. कुणाची मैत्री, आपुलकी तर कुणाची दुश्मनी, वादविवाद या गोष्टींनी घर गजबजून गेले आहे. प्रेक्षक देखील सर्व नजारा छानपैकी एन्जॉय करत आहे. सोशल मीडियावर प्रेक्षक आपल्या आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा तर नावडत्या स्पर्धकावर टिका करताना पाहायला मिळत आहेत. दिवसेंदिवस बिग बॉस मराठी च्या घरातील रंगत आणखीनच वाढणार यात शंकाच नाही. पण या सर्वाहून वेगळी अशी आणखीन एक रंगतदार गोष्ट  म्हणजे बिग बॉस मराठी सीजन १ मध्ये १०० दिवस राहिलेला स्पर्धक पुष्कर जोग आता बिग बॉस मराठी सीजन २ वर एक नवीन शो करणार आहे.

 टीम मराठी बॉक्स ऑफिस द्वारे तुम्हा सर्व प्रेक्षकांना कळविण्यास आनंद होत आहे की, लवकरच आमच्या यूट्यूब चॅनलवर पुष्कर जोग एक नवीन शो घेऊन येत आहे ज्याचे नाव आहे "एक घर बारा भानगडी". या शोमध्ये पुष्कर जोग बिग बॉस मराठी सीजन २ मध्ये घडणाऱ्या सर्व भानगडीवर बोलताना दिसणार आहे. तसेच बिग बॉस मधील स्पर्धकांच्या कणखर आणि कमकुवत बाजू देखील मांडणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या शोमध्ये प्रेक्षकांची मते विचारात घेतली जाणार आहेत. प्रत्येक आठवड्याला पुष्करचे मत, प्रेक्षकांचे विचार आणि स्पर्धकांचा खेळ या तिन्ही गोष्टींची योग्य सांगड आपल्याला "एक घर बारा भानगडी" या शोमध्ये पाहायला मिळणार आहेत. याव्यतिरिक्त या शोमध्ये आणखीन बरेचसे सरप्राईज देखील आहेत. "एक घर बारा भानगडी" चा पहिला एपिसोड उद्या म्हणजेच १ जून ला ५ वाजता येणार आहे. दर शनिवारी सायंकाळी ५ वाजता "एक घर बारा भानगडी" चा एक नवीन एपिसोड आपल्या भेटीला येणार आहे तर मग आत्ताच MARATHI BOX OFFICE यूट्यूब चैनलला सबस्क्राईब करा आणि आपली मते आम्हाला कमेंटद्वारे कळवा

Read Next...


Featured News

Read something similar