जबरदस्त स्टारकास्टचा नवीन सिनेमा झिम्मा... वाचा संपूर्ण बातमी

NEW MARATHI MULTISTARRER FILM ZIMMA

 

 

 

 मराठी कलाकार सध्या चांगल्या सिनेमासाठी एकत्र येताना दिसत आहेत. हेमंत ढोमे या गुणी दिग्दर्शकाच्या आगामी सिनेमासाठी अनेक मराठी कलाकार एकत्र येताना दिसणार आहेत. नुकतेच त्याच्या ये रे ये रे पैसे २ या सिनेमासाठी त्याने प्रसाद ओक, मृण्मयी गोडबोले, आनंद इंगळे, अनिकेत विश्वासराव, पुष्कर श्रोत्री आणि प्रियदर्शन जाधव या सर्व कलाकरांना एकत्र आणले. आणि आता हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच हेमंत ढोमे याने त्याच्या पुढील सिनेमाची घोशा केली आहे. त्याच्या नवीन प्रोडक्शन हाऊस अंतर्गत या सिनेमाची निर्मिती केली जात आहे तर स्वाती खोपकर यांची सहनिर्मिती असेल.

 
 
 
 
 
 

 

 क्षिती जोग आणि हेमंत ढोमे यांच्या 'चलचित्र' या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत नवीन मराठी चित्रपट "झिम्मा" ची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाची स्टारकास्ट मल्टिस्टारर असणार आहे. सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले क्षिती जोग, निर्मिती सावंत आणि सुहास जोशी हे सर्व मराठीतील आघाडीचे कलाकार या सिनेमात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. अमेय खोपकर एंटरटेनमेंट आणि चलचित्र कंपनी निर्मित "झिम्मा" हा सिनेमा २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'बघतोस काय मुजरा कर' आणि 'येरे येरे पैसा २' नंतर 'हेमंत ढोमे' पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

  

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar