बॉलीवूडपेक्षा मराठी सिनेमा सरस म्हणत सुबोध भावेने नाकारला हिंदी सिनेमा.. वाचा संपूर्ण बातमी

SUBODH BHAVE CHOOSE MARATHI FILM OVER HINDI

 

 

 मराठी सिनेमा सृष्टीतील एक अत्यंत गुणवान नट म्हणजे 'सुबोध भावे'. बालगंधर्व, लोकमान्य, कट्यार, आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर यासारख्या अनेक मराठी सिनेमातील त्यांच्या लाजवाब अभिनयाची स्तुती करावी तितकी कमीच. आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे सोबत भावे यांची फॅन फॉलोविंग देखील तितकीच तगडी आहे. मराठी सिनेमा आतापर्यंत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या सुबोध भावे यांच्या मते बॉलीवूडपेक्षा मराठी सिनेमा सरस आहे.
 
 
 
 
 
 
 
 नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुबोध भावे यांनी सांगितले की, "मध्यंतरी मला एका हिंदी सिनेमाची ऑफर आली होती परंतु मी मराठी प्रोजेक्टमध्ये बिझी असल्यामुळे मी तो हिंदी सिनेमा नाकारला. जर एक अभिनेता म्हणून संपूर्ण भारतात नाव कमवायचे असेल तर स्वतःला बॉलिवूड पुरता मर्यादित का ठेवावे? प्रादेशिक सिनेमांमध्ये बॉलीवूडपेक्षा अधिक चांगले अभिनेते आहेत. भारतीय सिनेमाची ओळख म्हणजे फक्त बॉलीवूड नव्हे. आपण हिंदी सिनेसृष्टीला खूपच महत्त्व दिले आहे, पण माझ्यासाठी बॉलिवूड म्हणजे काहीच नाहीये."

Read Next...


This Friday
Popular News

Read something similar