दिगदर्शक केदार शिंदे यांची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना विनंती. वाचा संपूर्ण बातमी.

सध्या लॉकडाऊनमूळे सगळेच जण घरी आहोत. कोणी घर बसल्या वर्क फ्रॉम होम करत आहेत. पण तुम्हा आम्हा सर्वांचं मनोरंजन करणाऱ्या कलाकारांचं काय ? सध्या चित्रपट , मालिकाचे शूटिंग बंद आहेत.  यामुळे कलाकारांच्या पोटापाण्याचे काय ? हा विचार  केला जातोय कि नाही? पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांच्या  पोटापाण्याचा सरकार विचार करतोय का?  कलाकार मंडळी विविध संस्थेमार्फत गरजुंना मदत करताना आपण बघतोय वाचतोय. पण सरकार कलाकारांचा विचार करतयं का ? असा प्रश्न प्रत्येक कलाकाराला पडला असेलच. म्हणूनच  दिग्दर्शक केदार शिंदे यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका व्हिडिओमार्फत  विनंती केली आहे. हा व्हिडिओ त्यांनी त्यांचा सोशल मीडियावर देखील शेअर केला आहे. 

 

 

 

 

 

केदार शिंदे म्हणतात की, लॉकडाऊन जेव्हा सुरु झालं तेव्हा सर्वात पाहिलं फिल्म इंडस्ट्री बंद करण्यात आली. लॉकडाऊन संपल्यावर देखील आमची इंडस्ट्री आधी सुरु होईल. मी खेड्यापाड्यातील कलाकारांविषयी देखील बोलतोय., प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम आहेत. पण हिंदी इंडस्ट्रीचा आकडा मोठा असतो म्हणून मी मराठी इंडस्ट्री विषयी बोलतोय. आम्ही एखादे इनकम टॅक्स नाही भरलं तर लगेच आम्हाला नोटीस येते पण आताच्या केंद्रशासनाच्या पॅकेज मध्ये आमचा लोकांचा साधा उल्लेख सुद्धा नाही.   केदार शिंदे पुढे काय म्हणतायत हे तुम्हीच  ऐका. 

Tags

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar