शुटिंगचे नुकसान होऊ नये म्ह्णून सई घेतला हा निर्णय .

मराठीतील ग्लॅमरस आणि आघाडीची अभिनेत्री म्हटलं तर सई ताम्हणकर हेच नाव सर्वांना आठवतं. काही दिवसांपूर्वी मिमी या आगामी चित्रपटाच्या शूटींग दरम्यान राजस्थान येथील मांडवा या लोकेशनवरुन  पॅक अप झाल्यानंतर हॉटेलवर परतताना तिचा पाय जोरात मुरगळला होता. पण चित्रपटाचे शूटिंग थांबू  नये म्हणून सईने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासोबतच्या चर्चाविनीमय करुन  विविध अॅंगलने शूट करण्याचा निर्णय घेतला होता. 

 

 

 

 

सध्या कोरोना व्हायरस चा प्रभाव वाढल्याने उद्योगधंद्यांबरोबर सिनेसृष्टीलाही या व्हायरसचा फटका बसला आहे. १९ ते ३१ मार्च पर्यंत चित्रपट, मालिकांचे शूटिंग थांबवण्यात आले आहे.पण अभिनेत्री सई ताम्हणकरने  आपल्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी रिएलिटी शोच्या निर्मात्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पायाला दुखापत झाली असतानाही अभिनेत्री सई ताम्हणकरने शूटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.  प्लॅस्टर असलेल्या पायासह तिने चित्रीकरण पूर्ण केल्याचे ह्या चित्रीकरणादरम्यान तिने केलेल्या फोटोशूटवरून दिसून येत आहे. 

 

Tags

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar