जितेंद्रच्या या नकारात्मक भूमिकेकडे त्याचा चाहत्यांचे लक्ष लागून. वाचा संपूर्ण बातमी.

जितेंद्र जोशी

नेटफ्लिक्सवर आतापर्यंत सर्वात जास्त चर्चीली गेलेली वेबसिरीज  म्हणजे 'सेक्रेड गेम्स'. 'सेक्रेड गेम्स'  या मालिकेत कॉन्स्टेबल काटेकरची व्यक्तीरेखा अभिनेता जितेंद्र जोशी याने साकारली होती. अभिनेता जितेंद्र जॊशी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावेळी बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानची निर्मिती असलेल्या 'बेताल' या वेब सीरिजमध्ये तो नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे.  जितेंद्रच्या या नकारात्मक भूमिकेकडे त्याचा चाहत्यांचे लक्ष लागून आहे. 

 

 

 

सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजमध्ये जितेंद्रने इन्स्पेक्टर सरताज सिंग अर्थात सैफ अली खानच्या विश्वासू माणसाची कॉन्स्टेबल काटेकरची व्यक्तिरेखा साकारली होती. या व्यक्तिरेखेनंतर प्रत्येकाच्या तोंडी जितेंद्र जोशी हेच नाव होतं. एका रात्रीत मराठमोळा जितेंद्र जोशी स्टार झाला. एका मुलाखतीत जितेंद्रने म्हटले की, 'काटेकरची व्यक्तिरेखा साकारल्यानंतर प्रेक्षकांना मला काहीतरी वेगळं द्यायचं होतं. म्हणूनच मी मुधालवन ही व्यक्तिरेखा निवडली. ही व्यक्तिरेखाही पार गुंतागुंतीची आहे आणि त्यात अनेक रहस्यही आहेत. तो खूप स्वार्थी आहे आणि लोकांना मूर्ख बनवत असतो.'

 

 

 

 

 

शाहरुख खानची निर्मिती असलेली ही वेबसीरिज एक झॉम्बी थ्रिलर आहे. यात विनीत कुमार आणि आहानना कुमरा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या वेबसीरिजबद्दल बोलताना जितेंद्र म्हणाला की, 'या सीरिजची कथा फार सशक्त आहे. घाबरवण्यासोबत ही सीरिज तुम्हाला गुंतवूनही ठेवेल.' २४ मे रोजी नेटफ्लिक्सवर 'बेताल' सीरिजचं प्रीमिअर होणार आहे.

 

 

 

'बेताल' ही एका अशा गावातली गोष्ट आहे जिथे दोन दशकांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचा कर्नल बेताल आपल्या झोम्बी फौजेला घेऊन परत येतो. कर्नलची बटालियन हळूहळू गावातील जनतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. पॅट्रिक ग्राहम यांनी या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं असून याआधी त्यांनी राधिका आपटेच्या 'घुल' वेबसीरिजचंही दिग्दर्शन केलं होतं.

Tags

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar