वीकेंडला टकाटक कमाई करत सुपरहिट ठरतोय टकाटक सिनेमा.. वाचा चित्रपटाची कमाई येथे

TAKATAK OPENING WEEKEND BOX OFFICE COLLECTION

आजवरचा सर्वात बोल्ड आणि हॉट मराठी चित्रपट म्हणून दर्शविण्यात आलेला 'टकाटक' हा सिनेमा गेल्या शुक्रवारी म्हणजेच २८ जून २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. ट्रेलर पासून ते नंतर सॉंग पर्यंत सर्वच गोष्टींमुळे या चित्रपटाची चर्चा रंगली होती. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून या सिनेमाची चांगलीच हवा सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती. शुक्रवारी आज सिनेमा जवळपास ३५०+ चित्रपटगृहात झळकला आणि या सिनेमाला चांगले ओपनिंग मिळाले. ५००० हून अधिक शोज मिळवलेल्या "टकाटक" या सिनेमाला पावसाचा आणि क्रिकेट मॅचचा काही प्रमाणात फटका बसला. परंतु तरीही ओपनिंग वीकेंडला या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 

 

गेल्या शुक्रवारी ३ मराठी सिनेमा प्रदर्शित झाले आणि त्यापैकी टकाटक  सिनेमाला सर्वाधिक स्क्रीन्स मिळाले. २ मराठी आणि २ हिंदी चित्रपटांची स्पर्धा करीत टकाटक या सिनेमाने विकेंडच्या तीन दिवसात ३.०५ कोटींची कमाई केली आहे. सोशल मीडियावर देखील या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ज्यांनी सिनेमा पाहिला त्यांनी या सिनेमाला पसंतीची पावती दिली आहे, आणि या गोष्टी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रथमेश परब, रितिका श्रोत्री, अभिजीत अमकर आणि प्रणाली भालेराव यांची प्रमुख भूमिका असलेला आणि मिलिंद कावडे दिग्दर्शित हा सिनेमा तुम्हीही चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा.

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar