मोगरा फुलाला सिनेमाची ओपनिंग वीकेंडला चांगली कमाई.. वाचा दिवसागणिक कमाई येथे

MOGRA PHULALAA

  आई-मुलाचेप्रियकर-प्रेयसीचे प्रेम अधोरेखित करणाराएक कौटुंबिक संदेश देणारा बहुप्रतीक्षित ‘मोगरा फुलला’ चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित झाला असून त्याला संपूर्ण महाराष्ट्रात तिकीट खिडकीवर रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. दिग्दर्शिका म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या श्राबणी देवधर यांचे बऱ्याच कालावधीनंतर झालेले पुनरागमनआघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी याचा वेगळ्या लुकमधील नायकसुमधुर संगीत आणि जीसिम्स सारख्या  दर्जेदार बॅनरची निर्मिती यांमुळे चित्रपटाबद्दल असलेली उत्कंठा कसोटीवर अगदी पुरेपूर उतरल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळत आहे.

 

 


 “
मोगरा फुलला' या सिनेमाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असून सिनेमाचे समीक्षकांनीदेखील खूप कौतुक केले आहे. मुंबई,पुणे,ठाणे येथील शहरांमधील प्रेक्षक ही घराघरातील कौटूंबिक गोष्ट अनुभवण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत आहेत . सिनेमाने १४ जून पहिल्या दिवशी शुक्रवारी ३७.५ लाख इतकी कमाई केली त्यानंतर दुसऱ्या शनिवार १५ जुन रोजी ५६.२ लाख तर १६ जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान असा रंगात सामना असूनदेखील प्रेक्षकवर्ग मोगरा फुललापाहण्यासाठी सिनेमागृहात पोहचला होता आणि तिसऱ्या दिवशी ५१.५ लाख इतकी कमाई केली आहे. आतापर्यंत चित्रपटाने एकूण पहिल्या तीन दिवसात १ करोड ४५ लाख इतकी कमाई केली आहे . त्याचबरोबर प्रेक्षकवर्गाचा चांगला प्रतिसाद बघून मोगरा फुलला सिनेमाच्या शोज मध्ये वाढ करण्यात आली आहे .

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar