प्रेक्षकांवर चिडून सुमित राघवनने नाटकाचा प्रयोग बंद केला.. वाचा नक्की काय घडलं

SUMMET RAGHAVAN
नाटकाचा प्रयोग छान रंगलेला असताना अचानक कुणातरी प्रेक्षकाचा मोबाईल वाचतो किंवा त्यांचे मूल रडायला लागते आणि त्या आवाजामुळे कलाकारांचा अभिनय भंग होतो. असाच एक अनुभव सुमित राघवनला आला आणि त्यांनी चालू प्रयोग बंद केला. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सुमित राघवनने आपला राग व्यक्त केला, आणि प्रेक्षकांकडून अपमान करून घेण्यासाठी आम्ही नाटक करावे का असा सवाल देखील उपस्थित केला.
याबद्दल सविस्तर माहिती देताना सुमित राघवन यांनी लिहिले की, "घडलं असं,वेगवेगळ्या लोकांचा मोबाईल वाजला त्या प्रयोगाला. प्लस एका गृहस्थाने दरवाजा उघडून आत बाहेर केलं,तसं करण्याला अजिबात आक्षेप नाही पण ते दार दर वेळी आदळायचं आणि मोठा आवाज व्हायचा,पुढे एक वयस्कर बाई दुस-या बाईला "अहो हळू बोला" असं बोलली,त्यावर‌ ती बाई दाराच्या बाहेर जाऊन बोलू लागली आणि ते बोलणं स्टेजवर एकू येत होतं आणि शेवटी एका पहिल्या रांगेतील प्रेक्षकाचा फोन वाजला आणि मी चिडून नाटक बंद केलं."
 आणखीन एक प्रसंग सांगताना सुमित राघवन यांनी लिहिले की, "नाशिकच्याच एका प्रयोगाला,"एक शून्य तीन" नावाच्या नाटकाचा प्रयोग सुरू होता आणि फोन वाजला एका प्रेक्षकाचा. तर तो बोलू लागला फोन वर,मी आणि Swanandi Tikekar स्टेजवर होतो. मी प्रयोग थांबवून त्या व्यक्तिकडे बघितलं तर त्याने हाताच्या इशा-याने "तुमचं चालू द्या" असं केलं आणि मी स्तब्ध झालो. तिकिट काढलं म्हणजे तुम्ही विकत घेतलं का आम्हाला? का म्हणून करावं‌ आम्ही नाटक? हा अपमान करून घेण्याकरता? म्हणजे एकीकडे नाट्यगृहांची दुरावस्था आहेच,तशा बकाल नाट्यगृहात काम करा वर आता प्रेक्षकांकडून अप्रत्यक्षरित्या असा अपमान सहन करा."

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar