खटक्यावर बोट जागेवर पलटी.. मॅटर सिनेमाला ७ वर्षे पूर्ण.. वाचा कमाई व इतर माहिती

MATTER MOVIE POSTER
 गुन्हेगारी विश्वावर अनेक मराठी चित्रपट आले त्यातले काहीच बिग बजेट आणि आपल्या लक्षात राहणारे असे आहेत. त्यापैकी एक म्हणजे आजच्याच दिवशी २०१२ या वर्षात प्रदर्शित झालेला "मॅटर" हा सिनेमा. मल्टीस्टारर असल्यामुळे आणि त्यातील खुसखुशीत संवाद, हलकासा मादकपणा यामुळे हा सिनेमा तरुणाईच्या पसंतीस पडला होता. आज या सिनेमाला ७ वर्षे पूर्ण होत आहेत. 
 मल्टिस्टारर म्हणावा असा हा  'जितेंद्र जोशी', 'संतोष जुवेकर', 'राजेश शृंगारपुरे', 'सुशांत शेलार', 'समीर धर्माधिकारी', 'उषा नाडकर्णी', 'मेघा धाडे', 'योगिनी चौक', 'मिनल घोरपडे' अशी भली मोठी स्टारकास्ट या सिनेमात आपल्याला पाहायला मिळाली होती. गुन्हेगारी विश्वावर भाष्य करणारा आणि त्यामुळेच खूपसे संवाद अतिशय तिखट अंदाजातील असल्यामुळे या सिनेमाला एक वेगळे महत्त्व प्राप्त होते. "अगडबम" यासारखा एक हलका फुलका चित्रपट बनवल्यानंतर दिग्दर्शक 'सतीश मोतलिंग' यांनी थोडासा जड म्हणावा असा "मॅटर" सिनेमा बनवला आणि तो तितक्याच चांगल्या रीतीने मांडला यासाठी त्यांचे विशेष कौतुक.


 'अभिजित कवठलकर' यांनी संगीत दिलेली या सिनेमातील गाणी देखील लोकांच्या पसंतीस उतरली होती. तसेच या सिनेमातील च्झणझणीत संवाद त्यापैकी एक म्हणजे "खटक्यावर बोट... आणि जागेवर पलटी" हा भलताच फेमस झाला होता. अनपेक्षित परंतु तितकाच मजेदार असा यख सिनेमाचा शेवट देखील तितकाच लक्षात राहतो. साधारणत २.५ कोटींचे बजेट असलेल्या या सिनेमाला प्रौढ विषयामुळे कौटुंबिक प्रेक्षकांचा पाठिंबा न मिळाल्यामुळे या सिनेमाने जेमतेम ४ कोटींच्या आसपास कमाई केली. आज ७ वर्षानंतर देखील या सिनेमाचे संवाद लोकांच्या लक्षात राहतात यातच सिनेमाचे यश म्हणावे लागेल.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar