प्रविण तरडेच्या सरसेनापती हंबीरराव मोहिते सिनेमाचे अंगावर काटा आणणारे पोस्टर पहा येथे..

PRAVIN TARDE AND TEAM

 'मुळशी पॅटर्न' च्या भव्य यशानंतर लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे त्यांच्या नवीन सिनेमासाठी सज्ज झाले आहेत. शिवजयंती निमित्ताने एका कार्यक्रमात अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक 'प्रविण तरडे' यांनी एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली होती. "छत्रपती शिवाजी महाराजां" चे विश्वासू "सरसेनापती हंबीरराव मोहिते" यांची कथा या सिनेमात आपल्याला पाहायला मिळेल असे त्यांनी सांगितले. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि संभाजी महाराजांचा राज्याभिषेक या दोन्ही गोष्टी रुपेरी पडद्यावर आपल्याला पाहायला मिळतील असेही ते म्हणाले. आता शिवराज्याभिषेक दिनी त्यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे.हिंदवी स्वराज्य राखलेल्या दोन्ही छत्रपतींचा सरसेनापती होण्याचा बहुमान ज्या एकमेव माणसाला मिळाला त्याची ही गोष्टं..
सरसेनापती हंबीरराव- नाती नाही माती जपणारा योध्दा..
कथा,पटकथा,संवाद आणि दिग्दर्शन- प्रविण विठ्ठल तरडे
संगीत- नरेंन्द्र भिडे
गीते- प्रणीत कुलकर्णी
छायाचित्रण- महेश लिमये
निर्मिती- संदिप मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंन्द्र बोरा
आज तलवार देवून रणशींग फुंकलय, आता
लवकरच वादळ मोठ्या पडद्यावर धडकणार
असे प्रवीण तरडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले. 
सोबतच या नवीन पोस्टर सोबत त्यांनी लिहिले कि,
नवा सिनेमा , नवा थरार / सर सेनापती हंबीरराव
लेखक दिग्दर्शक - प्रविण विठ्ठल तरडे आणि टिम."तुटून पडला जरी हाथ नाही सोडली तलवारीची साथ" या वाक्याने सर्व प्रेक्षकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. या चित्रपटात 'रमेश परदेशी', 'देवेंद्र गायकवाड', 'श्रीपाद चव्हाण' 'सुनील पालकर', 'प्रतीक मोहिते पाटील' ह्याच्यासोबत अनेक कलाकार आपल्याला पाहायला मिळतील. या सिनेमात मुख्य भूमिकेत म्हणजेच "हंबीरराव मोहिते" यांच्या भूमिकेत कोणता कलाकार पाहायला मिळणार याची घोषणा लवकरच करण्यात येईल. या चित्रपटाची कथा, संवाद, पटकथा आणि दिग्दर्शन या सर्व बाजूंची जबाबदारी प्रविण तरडे स्वत: सांभाळणार आहेत. ऐतिहासिक आणि बिग बजेट असा "सरसेनापती हंबीरराव मोहिते" या सिनेमा जानेवारी २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read Next...


Popular News

Read something similar