सिम्बाची २४० कोटीपैकी ९० कोटी कमाई मराठी कलाकार आणि प्रेक्षकांमुळेच... कसे ते वाचा...

MARATHGI ACTORS IN SIMMBA
२०१८ वर्षातील शेवटचा बिग बजेट सिनेमा असलेला "सिम्बा" संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला आणि तुफान चालला देखील. या सिनेमात "रणवीर सिंग" मुख्य भूमिका म्हणजेच एक मराठी पोलीस अधिकारी "संग्राम भालेराव" साकारत होता. परंतु महाराष्ट्रामध्ये या सिनेमाला एक वेगळेच आकर्षण मिळाले आणि त्याचे कारण म्हणजे या चित्रपटात असलेला मराठी कलाकारांचा भरणा. हा चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या मनाला चांगल्या रीतीने जुळला आणि त्यामुळेच या सिनेमाची कमाईदेखील महाराष्ट्रातील चित्रपटगृहात खूपच चांगली झाली.


 संपूर्ण महिन्याभरात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. जगभरात या सिनेमाने ४०० कोटींचा टप्पा गाठला आणि संपूर्ण भारतात या सिनेमाने २४० कोटींची जबरदस्त कमाई केली आहे. या २४० कोटींपैकी ९० कोटी हे फक्त मुंबई-महाराष्ट्र या भागात कमावले आहेत. टक्केवारीच्या आकडेवारीनुसार संपूर्ण भारतातील कमाई पैकी जवळपास ३८% कमाई मुंबई-महाराष्ट्र या भागातच केली असल्याचे दिसते. २०० कोटींपेक्षा जास्त कमाई केलेल्या कुठल्याही बॉलीवूड सिनेमासाठी मुंबई-महाराष्ट्र या भागातील कमाईची सर्वाधिक टक्केवारी "सिम्बा" या चित्रपटाचीच आहे.


 याचाच अर्थ "सिम्बा" सिनेमाच्या याच्यात सर्वात मोठा वाटा मराठी कलाकार आणि मराठी प्रेक्षकांचाच आहे. बाकी राज्यांच्या दृष्टीने मुंबई-महाराष्ट्र विभाग व्यावसायिकदृष्ट्या बॉलिवूडसाठी नेहमीच जास्त कमाई करून देणारा ठरला आहे. आणि त्यातही मराठी कलाकार एखाद्या बॉलीवूड सिनेमाला फायदा करून देत असतील तर मराठी कलाकार आणि प्रेक्षकांसाठी याच्यापेक्षा मोठी अभिमानाची गोष्ट कुठली नसावी. सिंबा चित्रपटात मराठी कलाकारांच्या अभिनयाची तर कौतुक झालच आहे आणि आता बॉक्स ऑफिस यशासाठी क्रेडिट म्हणजे सुवर्ण योगच. या यशाबद्दल "सिद्धार्थ जाधव", "वैदेही परशुरामी", "अरुण नलावडे", "उदय टिकेकर", "नेहा महाजन", "सौरभ गोखले", "विजय पाटकर", "सुलभा आर्या", "अश्विनी काळसेकर", "नंदू माधव", "गणेश यादव", "सायली पाटील" आणि "साहिल जोशी" मराठी कलाकारांचे अभिनंदन

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar