कोरोना मुळे या नावाजलेल्या कंपनीने घेतला हा निर्णय.

सध्या एकाच गोष्टीचं नाव घेण्यात येत आहे ते म्हणजे 'कोरोना व्हायरस' . देशभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा फटका उद्योगधंध्यापासून ते शाळा, कॉलेज , सिनेगृह- नाट्यगृह यांना देखील बसला आहे. ओपन पार्क, स्विमिंग पूल सुद्धा बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याचबरोबर सिनेसृष्टीलाही कोरोनाचा चां गलाच फटका बसला असून मालिका - चित्रपटाचे चित्रीकरण १९ ते ३१ पर्यंत थांबवण्यात आले आहे. 

 

 

 

 

 

 

तसेच सिनेसृष्टीतील  नावाजलेली कंपनी म्हणजे  Dreamers PR. निर्माते दीपक राणे यांनी  Dreamers PR या कंपनीपासून स्वतःचा करियरची सुरुवात केली होती.  दुनियादारी, प्यार वाली लव्हस्टोरी , तू हि रे , आणि लकी अशा अनेक गाजलेल्या चित्रपटाची तसेच दिल दोस्ती दुनियादारी, दुहेरी , फ्रेशर्स , अंजली अशा नावाजलेल्या मालिकांची निर्मिती त्यांनी केली आहे. कोरोना व्हायरसने सध्या भीतीच वातावरण चालू आहे. चित्रपटसृष्टीवर हे भयानक  सावट आलेलं पाहून   Dreamers PR या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा विचार करून कंपनीने "वर्क फ्रॉम होम" चा विडा उचला आहे. असं म्हणायला काही  हरकत नाही.  सर्वांच्या सुरक्षेचा विचार ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे.  

 

 

कोरोना  व्हायरसने आत्तापर्यंत 6 हजारांवर लोकांचा जीव घेतला असून आत्तापर्यंत दीड लाखांवर लोकांना या व्हायरसची लागण घातली आहे. भारतातही हा व्हायरस वेगाने फोफावत आहे.  १९ ते ३१ पर्यंत देण्यात आलेल्या या सुट्टी नंतर देशभरात काय  परिस्थिती असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. 

 

Tags

Read Next...


Popular News

Read something similar