'गॅटमॅट' चा मनोरंजक ट्रेलर झाला लाँच...

Gatmat

'प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं... तुमचं आमचं सेम असतं...' ही मंगेश पाडगावकरांची कविता प्रेमवीरांमध्ये प्रसिद्ध आहे. 

प्रेमात पाडणाऱ्या या कवितेने अनेकांचे 'गॅटमॅट' जुळवून दिलं  आहे. 

अवधूत गुप्ते प्रस्तुत आणि यशराज इंडस्ट्रीज निर्मित 'गॅटमॅट' हा सिनेमा येत्या १६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असून हा सिनेमा प्रेमीयुगुलांसाठी नक्कीच पर्वणी ठरणार आहे. 

नुकताच या सिनेमाच्या ट्रेलर मोठ्या दिमाखात प्रदर्शित करण्यात आला.

मुंबईतील वरळी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात 'गॅटमॅट' सिनेमाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली होती. 

निशीथ श्रीवास्तव दिग्दर्शित या सिनेमाचा  ट्रेलर, कॉलेज विश्वाची रंगतदार सफर प्रेक्षकांना घडवून आणतो.

सिनेमात अक्षय टंकसाळे, निखील वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे यांची मुख्य भूमिका आहे.

शिवाय 'गॅटमॅट' संस्थेचे चालणारे गमतीदार कामकाजदेखील प्रेक्षकांचं  भरघोस मनोरंजन करतं. 

मैत्री, प्रेम आणि रोमान्स दाखवणारा 'गॅटमॅट' सिनेमाचा हा  ट्रेलर प्रेक्षकांना नॉस्टेलजीक नक्कीच करेल.

'गॅटमॅट' सिनेमातील सर्व गाण्यांना सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक समीर साप्तीस्करचं संगीत लाभलं आहे. राजेंद्रप्रसाद श्रीवास्तव यांची निर्मिती असलेला हा सिनेमा, प्रेमात पडलेल्यांना आणि प्रेमात पडू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरेल हे नक्की

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar