मराठी रंगभूमीवर पहिल्यांदाच 3D तंत्रज्ञान आणणार चिन्मय मांडलेकर.. वाचा संपूर्ण माहिती

CHINMAY MANDELAKAR TO INTRODUCE 3D TECHNOLOGY ON MARATHI DRAMA STAGE

 

 

 
 
 मराठी रंगभूमी अभिनय आणि आशयाने संपन्न आहे असे आपण म्हणतो परंतु याव्यतिरिक्त देखील मराठी रंगभूमी मध्ये वेगवेगळे प्रयोग होत आहेत आणि प्रेक्षक त्यांना मोलाचा पाठिंबा देखील देत आहेत. 'चिन्मय मांडलेकर' दिग्दर्शित "अलबत्या गलबत्या" या नाटकाने गेल्या वर्षी रंगभूमीवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. तसेच त्यांचे "व्हॅक्युम क्लिनर" हे नाटकदेखील रंगभूमीवर उत्तम प्रतिसाद मिळवत आहे. या दोन्ही नाटकाच्या यशानंतर आता चिन्मय मांडलेकर मराठी रंगभूमीवर आणखीन एक आगळावेगळा प्रयोग करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मराठी नाट्यनिर्माते राहुल भंडारे यांची 'अद्वैत थिएटर' हि संस्था या बालनाट्याची निर्मिती करत आहे. 
 
 
 
 
 
 
 
 नवीन तंत्रज्ञानाचा वापर प्रेक्षकांना एक वेगळाच आनंद आणि अनुभव देतो आणि त्यामुळे प्रेक्षकांचा पाठिंबा देखील वाढतो असे मानणारे अभिनेते चिन्मय मांडलेकर पहिल्यांदाच मराठी रंगभूमीवर 3D तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत. त्यांच्या आगामी "निम्मा शिम्मा राक्षस" या नाटकामध्ये ते 3D मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत. याबद्दल सांगताना चिन्मय मांडलेकर म्हणाले की, "निम्मा शिम्मा राक्षसच्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदाच मराठी रंगभूमीवर तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. ही खूप महागडी आणि अवघड गोष्ट आहे आणि त्यात आम्हाला यश मिळेल की नाही याबद्दल देखील मी खात्री देऊ शकत नाही. पण काहीतरी नवीन करण्याची आवश्यकता तर आहेच जेणेकरून नाटक पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांना काहीतरी वेगळा पाहण्याचा आनंद देऊ शकतो."

Read Next...


Featured News

Read something similar