हा अभिनेता आणि त्याची पत्नी ठरले खरे कोविड योद्धा.....

कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी दिवसरात्र आपल्या स्वरक्षणासाठी झटत आहेत. पण या लढव्यासोबत असे अनेक हिरो आहेत जे गरजुंना मदत करत आहेत. अभिनेता अमोल बावडेकर  यांची पत्नी डॉ. प्रेरणा बावडेकर या होमिओपथी डॉक्टर आहेत. 

जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला पाठिंबा.

 आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी Ars alb 30 या गोळ्या उपयुक्त असल्याचं सांगितलं. यानंतर अचानक या गोळ्यांची मागणी वाढली आणि चढ्याभावाने या गोळ्या विकल्या जाऊ लागल्या. अनेक होमिओपथी दुकानांमध्ये तर याचा खप संपल्याचंही निदर्शनास आलं.  याचाच विचार करून  प्रेरणा आणि अमोल यांनी या गोळ्या घरी तयार करून पॅक करून गरजूंना वाटण्याची मोहीम सुरू केली.

 

चित्रपट महामंडळाच्या सभासदांच्या मदतीला धावल्या " माधुरी दीक्षित "

गोळ्या तयार करण्यासाठी आणि त्या पॅकेटमध्ये बसवण्यासाठी यंत्राचीही आवश्यकता असते. प्रेरणा यांच्याकडे गोळ्या पॅक करण्याचं यंत्र आधीच असल्यामुळे त्यांच्यासाठी हे काम अधिक सुकर झालं. एवढंच नाही तर अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने या गोळ्यांचं पॅकिंग करण्यात येतं. आतापर्यंत अमोल कुटुंबियांनी दिड हजारांहून अधिक लोकांमध्ये गोळ्यांचं वाटप केलं आहे. शिवाय त्यांनी अनेक पोलीस चौक्यांमध्ये जाऊन पोलीस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत  या गोळ्या दिल्या आहेत.

 

अमोल बावडेकर याविषयी म्हणतात की, 'जेव्हा आयुष मंत्रालयाने होमिओपथीच्या या गोळ्यांना हिरवा कंदील दाखवला तेव्हा अचानक याचा खप वाढला आणि पर्यायाने तुटवडाही जाणवू लागला. अनेक ठिकाणी काळाबाजार होतो. ही गोष्ट आम्हाला फार लागली. मग आम्ही कच्चा माल घरी आणून औषध तयार करण्याचा निर्णय घेतला. ही मूळ कल्पना प्रेरणाचीच होती. ग्लोव्ह्ज, चिमटे असे औषध तयार करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही विकत घेतल्या. औषध तयार झालं पण ते द्यायचं कसं याचा विचार करताना आम्ही घरीच त्याच्यासाठीचे पॅकेटही तयार केले.'

 

 

आम्ही या गोळ्यांचं मोफत वाटप करत आहोत. कारण अशा कठीण काळात धंदा करणं हा मूळ उद्देश असू नये असं आम्हाला वाटतं. ज्या ठिकाणी जाऊन देणं शक्य असतं तिथे आम्ही स्वतः जातो. पण जिथे जाणं शक्य नाही तिथल्या लोकांना घरी येऊन औषधं घेऊन जाण्यास सांगतो. काही पोलीस कर्मचाऱ्यांना हे औषध मिळालं होतं. पण त्यांच्या कुटुंबियांना मात्र मिळालं नव्हतं. त्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आम्ही औषध दिलं. जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा हीच एकमेव इच्छा आहे.   अनेक कलाकार मंडळी हि गरजुंना आपापल्या प्रकारे मदत करत आहेत. अमोल बावडेकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी सकारत्मकरित्या  विश्वास दाखवून गरजूंसाठी पुढाकार घेतला आहे.  

 

 

Tags

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar