माऊलीला लय भारी प्रतिसाद... वाचा माऊलीची कमाई...

MAULI POSTERगेल्या शुक्रवारी १४ डिसेंबर २०१८ ला या वर्षातील सर्वात मोठा मराठी सिनेमा म्हणजेच "माऊली" संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. "रितेश देशमुख" ची प्रमुख भूमिका असलेला या सिनेमाला "लय भारी" प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास ४५० स्क्रीन्सवर प्रदर्शित होऊन "माऊली" आतापर्यंतचा सर्वात जास्त स्क्रिन्सवर रिलीज होणारा मराठी चित्रपट बनला. तर वीकेंडच्या तीन दिवसात या सिनेमाला प्रेक्षकांचा "टेरर्" रिस्पॉन्स मिळाला आहे.  

ॲक्शन पॅक्ड्, टाळ्या आणि शिट्ट्या खेचणारे संवाद, हिट गाणी आणि विठ्ठल भक्ती अशा सर्वांचा मिश्रण असलेला माऊली सिनेमा प्रेक्षकांच्या तसेच समीक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. वीकेंडला तीन दिवसात या सिनेमाने जवळपास १० कोटींची कमाई केल्याचा अंदाज आहे. अधिकृत आकडा अजून जाहीर झाला नसून तो यापेक्षा जास्तही असू शकतो. चार वर्षांपूर्वी रितेश देशमुखच्याच "लय भारी" या चित्रपटाने वीकेंडला १० कोटी करण्याचा रेकॉर्ड केला होता आणि आता माऊली सुद्धा त्याच वाटेवर चालत आहे.  

महाराष्ट्रातील जवळपास ४५० स्क्रीन्सवर हा सिनेमा इंग्लिश सबटायटल सोबत रिलीज झाला आहे त्यामुळेच अमराठी प्रेक्षकांनीही हा सिनेमा बघण्यासाठी चित्रपटगृहात हजेरी लावली. शहरी भागात सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात या चित्रपटाने हाऊसफुल्लचे बोर्ड झळकावले आहेत. एकंदरीत नंबर पासून सुरू असलेली मराठी सिनेमांची यशाची गाथा "माऊली" पुढे नेणार असेच दिसत आहे.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar