हिंदी संगीतकारांना मागे सारत अजय-अतुलने पटकावला सर्वोत्कृष्ट संगीतकार पुरस्कार

AJAY ATUL

मराठी सिनेमासृष्टीतील आताच्या घडीजचे सर्वाधिक लोकप्रिय संगीतकार म्हणजे 'अजय-अतुल' ही जोडी. त्यांच्या अनेक सुपरहिट गाने प्रेक्षकांवर जादू केली आहे. गेल्या जवळपास पंधरा वर्षात अनेक सुपरहिट गाणी त्यांनी मराठी सिनेमा दृष्टी दिली. "जत्रा", "सावरखेड एक गाव", "जबरदस्त", "साडे माडे तीन", "उलाढाल", "जोगवा", "नटरंग", "रिंगा रिंगा", "फॅन्ड्री", "लय भारी", "सैराट" आणि "माऊली" यामधील त्यांची गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत. मराठी सिनेमासृष्टीत आघाडीचे संगीतकार झाल्यानंतर त्यांनी हिंदी सिनेमासृष्टीत देखील आपल्या सुरांची कमाल दाखवली. "सिंघम", "अग्निपथ", "बोलबच्चन", "पिके", "ब्रदर्स", "ठग्स ऑफ हिंदोस्तान", "झीरो" आणि "तुंब्बाड" ही त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या काही हिंदी सिनेमांची यादी.

 आगामी काळात देखील 'अजय अतुल' अनेक मोठमोठी हिंदी सिनेमांना संगीत देताना दिसणार आहेत. "सुपर ३०", "पानिपत", "तानाजी", "झुंड", "समशेरा" हे मोठे बॉलिवूड सिनेमे सध्या त्यांच्या खात्यात आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या "धडक" या हिंदी, अर्थात मराठी ब्लॉकबस्टर "सैराट" सिनेमाचा रिमेक असलेल्या सिनेमासाठी, अजय-अतुल यांनी संगीत दिले होते. या सिनेमातील गाणी देखील त्यांच्या कर्तृत्वाला शोभतील अशीच हिट झाली होती. म्हणूनच नुकत्याच पार पडलेल्या तुमची 'झी सिने अवार्डस् २०१९' या सोहळ्यामध्ये 'सर्वोत्कृष्ट संगीतकार' या विभागांमध्ये 'अजय-अतुल' यांना नामांकन मिळाले होते. आणि बाकीच्या सर्व संगीतकारांना मागे सारत 'अजय-अतुल' यांनी 'झी सिने अवार्ड २०१९' सोहळ्यामध्ये 'सर्वोत्कृष्ट संगीतकार' या पुरस्कारावर आपली मोहर उमटवली. हि मराठमोळी संगीतकार जोडी अधिकाधिक पुरस्कार मिळवत राहो आणि असेच प्रगती करत राहो यासाठी त्यांना शुभेच्छा.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar