"क्षणभर सेटवर" जाणून घ्या संभाजी मालिकेच्या कलाकारांकडून

Chhatrapati sambhaji poster
"छत्रपती संभाजी" ही ऐतिहासिक मालिका सध्या झी मराठीवर गाजत आहे. त्यातील भव्य-दिव्य सेट्स आणि रुबाबदार व्यक्तिरेखा संवाद, त्या काळाची केलेली चोख मांडणी हे सर्व लोकांच्या पसंतीस उतरत आहे. टीव्हीच्या पडद्यावर पाहताना डोळ्याला सुखद दिसणारे शूटिंग लोकेशन्स आणि सेट्स प्रत्यक्षात कसे असतात हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते, तर त्यासाठी नक्की पहा आमचा हा व्हिडिओ... 
संभाजी मालिकेतील गड, किल्ले, दिवाणखाना, महा-दरवाजा, दरबार या सर्व गोष्टी पडद्यावर खूपच शोभून दिसतात त्या सर्व गोष्टी आमच्या व्हिडिओ टिपल्या आहेत. त्याचबरोबर संभाजी व्यक्तिरेखा साकारणारे "डॉ अमोल कोल्हे" यांचे मालिकेच्या शूटिंग वरील नवनवीन किस्से व अनुभव जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहावा. शूटिंग मध्ये आव्हाने आणि त्यांना सामोरे जाताना घडलेल्या गोष्टी "डॉ अमोल कोल्हे" यांनी व्यक्त केल्या आहेत. 


 
स्त्री व्यक्तिरेखा साकारणाऱ्या पल्लवी वैद्य आणि स्नेहलता वसईकर या दोघांनीही शूटिंगवर रोज करावी लागणारी मेहनत, त्यासाठीची तयारी आणि रोज घडणारे धमाल विनोदी किस्से यानिमित्ताने आपल्यासोबत शेअर केले आहेत. हा व्हिडीओ तुम्ही नक्की बघा आणि याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar