मराठीत स्टार पेक्षा आशय महत्त्वाचा हे सैराटने सिद्ध केले :- महेश मांजरेकर....

MAHESH MANJREKAR
 

 मराठी सिनेमाने अटकेपार झेंडा रोवला आहे असे आपण म्हणतो आणि त्यापैकी एक सिनेमा म्हणजे २०१६ मध्ये आलेला 'नागराज मंजुळे' यांचा "सैराट". आर्ची आणि परश्याची प्रेम कहानी आणि त्यानंतर समाजातील उच्च निच्च हा भेदभाव दाखवून मन सुन्न करणारा हा सिनेमा मराठीतील सर्वाधिक कमाईचा सिनेमा ठरला. या सिनेमात कोणीही मोठा स्टार नसून सिनेमाचा विषयात सगळ्यात मोठा स्टार ठरला. याच विधानावरून दिग्दर्शक 'महेश मांजरेकर' यांनी आपले मत मांडले आहे.


 नुकतेच "भाई :- व्यक्ति की वल्ली" या सिनेमाच्या दरम्यान एका मुलाखतीत 'महेश मांजरेकर' म्हणाले की, "आज प्रेक्षक चांगल्या विषयासाठी सिनेमा पाहायला जातात. म्हणूनच आज आपण एका चांगल्या परिस्थितीत आहोत जेथे आपण वेगवेगळे प्रयोग करून प्रेक्षक ते बघायला येतील अशी अपेक्षा ठेवू शकतो. एक काळ होता जेव्हा फक्त सिनेमात मोठे स्टार्स असले तरच सिनेमा चालायचा. पण आता तसे होताना दिसत नाही याचा आनंद आहे."


 याच बाबतीत मराठी सिनेसृष्टी बद्दल विचारले असता 'महेश मांजरेकर' सांगतात की, "मराठी सिनेसृष्टीत प्रेक्षक कधीही स्टार्सच्या मागे लागून सिनेमा पाहायला गेले नाहीत. मराठी सिनेमात तसा कोणी स्टार नसतो. प्रेक्षक सिनेमाच्या आशयासाठी जातात. पहा ना, सैराट मध्ये कोणीही मोठा स्टार नसताना तो एवढा मोठा हिट झाला, यावरून हे सिद्ध होते." 
"सैराट" ला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे आणि सिनेमाच्या तिकीटबारी वरील कमाईमुळे हे सिद्ध होते की स्टार्स पेक्षा सिनेमाचा विषय जास्त महत्त्वाचा असतो.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar