ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांनी घेतला शेवटचा श्वास. वाचा संपूर्ण बातमी.

मराठी सृष्टीची ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांनी पुण्यामध्ये वयाच्या ८८व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.  त्यांच्या लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्यासोबत केलेले त्यांची पात्रे सर्वांच्या लक्षात राहिली. 'चल रे लक्ष्या मुंबईला', 'खट्याळ सासू नाठाळ सून', 'खरे कधी बोलू नये', 'माझा पती करोडपती', 'अशी ही बनवाबनवी', 'रंगत संगत', 'थरथराट', 'झपाटलेला' इत्यादी चित्रपटातील त्यांच्या भूमिका खास लक्षात राहिल्या.

 

 

 

 

 

 

 

कधी व्हिलन, कधी विनोदी, कधी एका मुलीचा भोळा बाप, कधी तडफदार कमिशनर तर कधी अतरंगी मामा अशा अनेक भूमिका त्यांनी लीलया पेलल्या. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे या गावातून आलेल्या जयराम खणखणीत ग्रामीण भाषा बोलणारा कणखर अभिनेता म्हणून त्यांनी सुरुवातीला ओळख मिळवली.

 

सुरूवातीला सरपंच, पाटील अशा ग्रामीण भूमिका त्यांनी केल्या. मात्र त्यानंतर 'गंमत जंमत', 'दे दणादण', 'नवरी मिळे नवऱ्याला', 'झपाटलेला', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' अशा अनेक चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका जयराम कुलकर्णी यांनी साकारल्या. त्यांची पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिका खास गाजल्या. असा अष्टपैलू अभिनेता हरपल्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज दुपारी बारा वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Read Next...


Popular News

Read something similar