अनुभवा 'गोमू संगतीनं...' गाण्याची जादू पुन्हा एकदा !

Ani Dr Kashinath Ghanekar

मराठी रंगभूमीवरील पहिला सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट येत्या दिवाळीत, प्रदर्शित होत आहे.


डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तसंच मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीचा सोनेरी काळ पुन्हा या चित्रपटाद्वारे पाहता येणार आहे.

या चित्रपटातलं पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.'हा खेळ सावल्यांचा' चित्रपटातील 'गोमू संगतीनं' हे गाणं खूपच लोकप्रिय झालं होतं. आजही या चित्रपटाची आणि त्यातल्या गाण्याची जादू रसिकांच्या मनावर कायम आहे. या चित्रपटात डॉ. काशीनाथ घाणेकर यांची भूमिका सुबोध भावे साकारत आहे. तर ‘गोमू संगतीनं’ या गाण्यासाठी आशा ताईंची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता माळीनं साकारली आहे.जुन्या गाण्याचं चित्रीकरण त्याच पद्धतीनं करण्यात आलं आहे.

नवं गाणं प्रदर्शित होताच ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. ८ नोव्हेंबरला ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, या चित्रपटात सुबोध भावे सोबत सोनाली कुलकर्णी, मोहन जोशी, सुमित राघवन असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar