मुंबई पुणे मुंबई 3 नंतर सतीश राजवाडे करणार मर्डर

SATISH RAJWADE
एक मालिका आणि सिनेमा दिग्दर्शक म्हणून "सतीश राजवाडे" आपणा सर्वांना माहीत आहे. त्याच्या सर्व मालिका आणि चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. लवकरच त्याचा "मुंबई पुणे मुंबई ३" बहुचर्चित सिनेमा रिलीज होत आहे. यानंतर "सतीश राजवाडे" काय करणार असा प्रश्न त्याच्या फॅन्सना पडला होता तर याचे उत्तर म्हणजे मुंबई पुणे मुंबई ३ नंतर सतीश राजवाडे "मर्डर" करणार आहे. ऐकून धक्का बसला ना? 


 
अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे रंगभूमीवर "अ परफेक्ट मर्डर" हे नाटक करणार आहे. खूप वर्षांनंतर सतीश राजवाडे रंगभूमीवर परतणार आहे. या आधी शेवटचे त्याने "ऑल दि बेस्ट" या नाटकामध्ये काम केले होते त्यानंतर मालिका आणि सिने दिग्दर्शक म्हणून त्याची गाडी सुसाट चालू राहिली. तसेच याआधी सतीश राजवाडे "टूरटूर" या नाटकात गुजराती व्यक्तिरेखा तर "ऑल दि बेस्ट" नाटकामध्ये बहिऱ्या माणसाची धमाल भूमिका साकारली होती.  
 आल्फ्रेड हिचकॉक यांच्या कथेवर आधारीत "अ परफेक्ट मर्डर" हे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्री हे नवीन सस्पेन्स थ्रिलर नाटक आपल्यासाठी घेऊन येत आहे. कॉलेज एकांकिका पासूनच पुष्कर श्रोत्री आणि सतीश राजवाडे एकमेकांना ओळखतात म्हणूनच या नाटकासाठी पुष्करने दिग्दर्शक विजय केंकरे यांना सतीशच नाव सुचवलं. सतीश आणि पुष्कर सोबत या नाटकात अभिनेत्री श्र्वेता पेंडसे तसेच अभिजीत केळकर हे दोघेही झळकणार आहेत. निलेश शिरवाईकर लिखित या नाटकाची निर्मिती निनाद करपे यांनी केली आहे.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar