शिवाजी महाराजांच्या विचारांची आणि विलक्षण परिवर्तनाची जाणीव करून देणारा छत्रपती शासन

CHATRAPATI SHASAN POSTER

 "छत्रपती शिवाजी महाराज" योग्य रीतीने समजून घेऊन त्यांचे विचार, तत्व आणि दूरदृष्टी या सर्वांची अंमलबजावणी जर आपण स्वतःमध्ये केली तर आपल्या कडून खूप चांगल्या गोष्टी समाजात घडू शकतात हे दाखवून देणारा सिनेमा म्हणजे "छत्रपती शासन". 'प्रबोधन फिल्म्स' आणि 'सवाई मार्तंड निर्मित' आणि 'खुशाल म्हेत्रे' दिग्दर्शित "छत्रपती शासन" सिनेमा 'उत्कर्ष कुदळे', 'प्रियांका कागले', 'खुशाल म्हेत्रे' यांची निर्मिती आहे. आजच्या तरुणाईला हा चित्रपट शिवशाही बद्दल अचूक मार्गदर्शन करणारा आहे.


 महाराजांचे आयुष्य १८३०६ दिवसांचे होते त्यातून नेमके काय शिकायचे? काय बोध घ्यायचा? हे सांगणारा हा चित्रपट आहे. प्रतिकांची, प्रतिमांची, पुतळ्यांची पूजा करण्यापेक्षा किंवा जय शिवाजी जोशात म्हणण्यापेक्षा "शिवाजी महाराज" नक्की काय म्हणतात हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटात मार्फत केला गेला आहे. महाराजांची खरी शिकवण जनमानसात रुजवण्यासाठी झटणारा एक प्राध्यापक, महाराजांच्या प्रभावाने जीवनाची दिशा बदललेला एक नवतरुण, आणि महाराजांच्या नावाचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापर करणारा एक राजकारणी एकमेकांसमोर उभे ठाकतात आणि सुरू होते, एक लढाई विचारांची, अशी या सिनेमाची थोडक्यात कथा. 


 "छत्रपती शासन" या सिनेमात अभिनेता 'मकरंद देशपांडे', 'संतोष जुवेकर', 'किशोर कदम', 'अभिजित चव्हाण', 'प्रशांत मोहिते', 'अनिल नगरकर', 'सायली काळे', 'प्रथमेश जोशी' 'श्रेयसचंद्र गायकवाड', 'विष्णू केदार', 'पराग शहा', 'अभय मिश्रा', 'धनश्री यादव', 'किरण कोरे', 'राहुल बेलापूरकर', 'सायली पराडकर', 'रामचंद्र धुमाळ', 'मिलिंद जाधव' आणि 'जयदीप शिंदे' यांच्या भूमिका आहेत. या सिनेमात चार गाणी वेगवेगळ्या धाटणीची आणि प्रत्येक गाण्याचे संगीत दिग्दर्शन वेगवेगळ्या संगीत दिग्दर्शकाने केले आहे. आपण शिवभक्त आहोत असं अभिमानाने मिरवतो छाती ठोकपणे सांगतो पण आपण त्यांच्या आदर्श प्रमाणे वागतो का याचे उत्तर आपण स्वतः शोधण्यासाठी हा चित्रपट नक्की पहा १५ मार्च पासून आपल्या जवळच्या सिनेमागृहात.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar