शिवला बघून त्याच्या चाहतीचे अश्रू अनावर.. वाचा सविस्तर.

SHIV THAKARE

बिगबॉस मराठी सिझन दोनने घर घरात सगळ्यांचाच मनात राज्य केलं होत. बिग बॉस मराठीचा दुसऱ्या सीझनने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. पहिल्या सिझन नंतर आता यावर्षीच्या सिझनमध्ये मराठीमुलगा 'शिव ठाकरे' विजयी ठरला.  शिव हाच बिग बॉस मराठी २ या कार्यक्रमाचा विजेता ठरेल असा अंदाज कार्यक्रमाच्या काही  दिवसापासूनच लावला जात होता. शिवला या शोमुळे चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळतं आहे. त्याला याची प्रचिती सातत्याने येताना दिसते आहे. मात्र नुकत्याच एका इव्हेंटमध्ये शिव व वीणा यांनी हजेरी लावली होती. तिथे या दोघांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. मात्र तिथे आलेल्या शिवच्या चाहतीनं सर्वांचं  लक्ष वेधून घेतलं.

 

 

हेही वाचा : 'उतरंड' या लघुपटाचे निर्माते मराठी सिनेसृष्टीत घेऊन येतायत विनोदी कमर्शिअल सिनेमा.

 

 

बिगबॉस मराठी मध्ये सर्वात जास्त शिव ठाकरेचे चाहते होते. बिगबॉसच्या घरात असून देखील शिवच्या चाहते त्याला सोशल मीडियावरून शुभेच्छा देतच होते.  शिव ठाकरे व वीणा जगताप यांनी डोंबिवलीतील नवरात्रौत्सव मंडळाला भेट दिली. 

 

 

हेही वाचा : स्टार प्रवाहवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ मालिकेचे १०० भाग पूर्ण.

 

तिथल्या चाहत्यांचे भरभरून मिळालेलं प्रेम पाहून ते दोघे चकीत झाले. या गर्दीत शिवच्या एका फॅन सगळ्यांचं लक्ष वेधून घेतल. शिवला पाहता या चाहतीला तिचे अश्रू अनावर झाले. तिचा हा व्हिडीओ शिवने त्याच्या इंस्टग्रामवर देखील पोस्ट केला आहे. "रडू नकोस तुम्ही सगळे माझ्यावर प्रेम करता तेच खूप आहे." असं देखील शिवने लिहलं आहे. 

 

Tags

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar