महात्मा फुले यांचा बायोपिक सत्यशोधक.. वाचा कोण साकारतंय ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुलेंची भूमिका

SATYSHODHAK POSTER

 मराठी असो किंवा हिंदी सिनेमासृष्टी, दोन्ही ठिकाणी सध्या बायोपिकचा ट्रेंड जोरात सुरू आहे. नजीकच्या काळात बनलेल्या बायोपिक सिनेमांनी तिकीटबारीवर बक्कळ कमाई केली आणि प्रेक्षकांची मने देखील जिंकली. मराठी सिनेसृष्टीमध्ये गेल्या सहा महिन्यात ३ बायोपिक सिनेमे घेऊन गेले. "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर", "ठाकरे" आणि "भाई : व्यक्ती की वल्ली" या तीनही सिनेमांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. याच ट्रेंडला पुढे येण्यासाठी आणखीन एका ऐतिहासिक महापुरुषावर बायोपिक सिनेमा येऊ घातला आहे. थोर समाजसेवक 'महात्मा ज्योतिबा फुले' आणि त्यांच्या पत्नी 'सावित्रीबाई फुले' यांची संघर्षगाथा सांगणारा "सत्यशोधक" हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 एवढ्या महान व्यक्तिमत्वावर येणाऱ्या सिनेमात त्यांची भूमिका साकारणारा नट देखील तितक्याच तोडीचा असला पाहिजे. म्हणूनच या सिनेमात 'महात्मा ज्योतिबा फुले' यांची भूमिका साकारण्यासाठी दमदार अभिनयाचे कौशल्य असलेल्या 'संदीप कुलकर्णी' यांची निवड झाली आहे. तर त्यांच्या साथीला म्हणजेच 'सावित्रीबाई फुले' यांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री 'राजश्री देशपांडे' ची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी संदीप कुलकर्णीला आपण 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेबसिरीजमध्ये तर 'राजश्री देशपांडे' यांना 'सॅक्रेड गेम्स' मध्ये पाहिले होते. डिजिटल विश्वात आपल्या अभिनयाची चमक दाखवल्यानंतर हे दोघे आता "सत्यशोधक" या बायोपिक सिनेमात एकत्र पाहायला मिळतील. या सिनेमाचे अर्ध्याहून अधिक शूटिंग संपले असून वर्षाच्या शेवटच्या काळात हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar