३ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या येल्लो सिनेमाला ५ वर्षे पूर्ण... वाचा सिनेमाची संपूर्ण माहिती

YELLOW MOVIE POSTER

 शारीरिक अपंगत्वावर मात करून यश संपादित करणाऱ्यांची प्रेरणादायी कथा आपण नेहमीच वाचत असतो. अंगावर रोमांच उभा करणारा त्यांचा प्रवास किती अवघड असतो याची कल्पनादेखील एक साधारण आयुष्य जगणाऱ्या माणसाला सहन होणार नाही. महेश लिमये दिग्दर्शित ह"येल्लो" हा एक प्रेरणादायी चित्रपट आजच्या दिवशी म्हणजेच ४ एप्रिल २०१९ प्रदर्शित झाला होता. आज या सिनेमाला ५ वर्षे पूर्ण होत आहेत त्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन.
 मुक्ता आणि शेखर यांची मानसिकदृष्ट्या दुर्बल मुलगी गौरी हिची भावनिक आणि प्रेरणादायी गोष्ट या सिनेमात गुंफली होती. मुग्धा या भूमिकेत 'मृणाल कुलकर्णी' आणि शेखर या भूमिकेत 'मनोज जोशी' या दोघांनी चोख अभिनय केला होता. गौरीच्या भूमिकेत गौरी गाडगीळने एक लक्षात राहणारा परफॉर्मन्स दिला होता. 'उपेंद्र लिमये' यांनी साकारलेला प्रशिक्षक देखील आजवर प्रेक्षकांच्या लक्षात राहिला आहे. ऋषिकेश जोशी यांनी देखील एक महत्वाची भूमिका साकारली होती. लहानग्या गौरीच्या भूमिकेत 'संजना राय' हिने तर कमालच केली होती.
 जबरदस्त आशय असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी समाजसेवकांच्या पसंतीची पावती मिळाली होती. IMDb या लोकप्रिय वेबसाईटवर प्रेक्षकांनी या सिनेमाला ८.५/१० असे उच्च रेटिंग दिले आहे. पुरस्कारांच्या बाबतीत देखील आज सिनेमा आपला डंका वाजवत राहिला. ६१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाला स्पेशल ज्युरी अवॉर्ड, स्पेशल मेन्शन बालकलाकार (गौरी गाडगीळ), स्पेशल मेन्शन बालकलाकार (संजना राय) आहे असे तब्बल ३ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar