लागिरं झालं जी मधील जयडी उर्फ किरण ढाणे परतणार... वाचा संपूर्ण बातमी....

KIRAN DHANE FROM LAGIR JHAL JI

झी मराठीवरील "लागिर झालं जी" मालिका रसिक प्रेक्षकांच्या पसंतीच्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. मुख्य कलाकारांना वगळता अन्य सहाय्यक व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकारांचे देखील प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. त्यापैकीच एक म्हणजे 'किरण ढाणे' हिने साकारलेली 'जयडी'. काहीशी विरोधी व्यक्तिरेखा साकारून देखील तिने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. नंतर काही कारणात्सव तिला ही मालिका सोडून द्यावी लागली.

 'किरण ढाणे' हिने मालिकेला रामराम ठोकल्यानंतर प्रेक्षकांनी काहीशी नाराजगी व्यक्त केली होती. परंतु आता ती नाराजगी दूर होण्याची चिन्हे आहेत. तिच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे आणि ती खुशखबर म्हणजे जयडी लवकरच अभिनय विश्वात परतणार आहे. याबद्दलचा व्हिडिओ तिने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केला आहे.


 व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा :- https://www.instagram.com/p/BtVYVNPAK7R/?utm_source=ig_web_copy_link या व्हिडिओमध्ये किरण म्हणते की, "मी लवकरच मुंबईला येते आहे. कशासाठी ते मी नाही सांगणार, ते तुम्ही गेस करा आणि मला कमेंट्स मध्ये कळवा." या व्हिडिओवर प्रेक्षकांनी तिला नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे अशा कमेंट्स केल्या आहेत. त्यानंतर तिने आणखीन एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात ती म्हणते की, मी पहिल्यांदाच खूप दिवसांसाठी मुंबईला येत आहे. लवकरच तुम्हाला कळेल कशासाठी ते... यावरून एक अंदाज बांधता येतो की नक्कीच तिला एक नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे आणि याची घोषणा ती स्वतः लवकरच करेल.

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar