कोरोना संकटामुळे २०२० मध्ये चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद होती. त्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर पडला. परंतु आता योग्य सावधगिरी बाळगून सिनेमांच्या शुटिंगचे काम सुरू झाले आहे. तसेच सिनेमागृह आणि नाट्यगृह देखील सुरू करण्यात आली आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आजपासून देशभरात 100 टक्के क्षमतेने सिनेमागृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
तसेच काही दिवसांपूर्वी मराठी सिनेसृष्टीतील सर्वात मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने कोरोनानंतरच्या पहिल्या सिनेमाची घोषणा केली होती. झी स्टुडीओजचा 'पांडू' हा सिनेमा थिएटरमध्ये लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन 'विजू माने' यांनी केले आहे. तर 'मंगेश कुलकर्णी' यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
लेखक - दिग्दर्शक विजू माने यांनी 'पांडू' सिनेमाचे पोस्टर सोशल मिडियावर शेअर केले होते. त्यात त्यांनी ''पांडू येतोय तुम्हाला खळखळून हसवायला'' असे कॅप्शन लिहीले होते. त्यावरून असे लक्षात येते की हा सिनेमा विनोदी असणारं आहे.
झी स्टुडिओ प्रस्तुत, मंगेश कुलकर्णी निर्मित आणि विजू माने दिग्दर्शित पांडू हा सिनेमा नविन वर्षात नवं चैतन्य घेऊन येणारं यात काही शंकाचं नाही.