जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर १४ जणांना फसवल्याचा आरोप. वाचा संपूर्ण बातमी

जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे सध्या एका गुन्हयाचा विळख्यात अडकले आहेत. पुण्यात मुळशी तालुक्यातील डोंगरगाव मधील जमिनीची स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदा विक्री करुन 14 जणांची फसवणूक केल्याचा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जयंत बहिरट यांनी ९६ लाख ९९ हजार रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार केली होती. 

 

त्यांच्या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ वर्षांपूर्वी जयंत म्हाळगी आणि सुजात म्हाळगी यांनी सुजाता फार्म प्रा. लिमिटेड स्थापन करुन 'गिरीवन प्रोजेक्ट' कंपनीची स्थापना केली होती. त्यातील गिरीवन प्रोजेक्टचे विक्रम गोखले हे अध्यक्ष आहेत. त्यांनी हा प्रकल्प सरकारमान्य असल्याचं सांगत खोटी प्रलोभनं देऊन ग्राहकांना आकर्षित केलं, असा आरोप ठेवण्यात आला आहे.विक्रम गोखले यांच्यासह तिघांनी 96 लाख 99 हजार रुपयांना फसवणूक केल्याची तक्रार जयंत प्रभाकर बहिरट यांनी दिली होती. त्यानुसार अभिनेते विक्रम चंद्रकांत गोखले, जयंत रामभाऊ म्हाळगी, सुजाता जयंत म्हाळगी यांच्यावर पुण्यातील पौड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Tags

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar